वास्तूच्या प्रवेश दारावर घोड्याची नाल का लावतात? त्यामुळे खरोखरच आर्थिक लाभ होतात का? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:58 PM2022-04-11T12:58:17+5:302022-04-11T12:58:38+5:30
लोखंड हा शनीचा प्रिय धातू असल्याने घोड्याची नाल वापरण्यासाठी वास्तुशास्त्राने दुजोरा दिला आहे. सविस्तर जाणून घ्या!
ज्योतिषशास्त्रात सोने, चांदी, लोखंड आणि इतर धातूंचे विशेष महत्त्व आहे. तसेच या धातूंना धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र तसेच वास्तू शास्त्रानेही धातूंच्या वापराला प्राधान्य दिले आहे. असे मानले जाते की प्रत्येक धातू कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी आणि देवतेशी संबंधित आहे. यापैकी एक धातू म्हणजे लोखंड. लोखंड शनिदेवाला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की शनिवारी लोखंडापासून बनलेली कोणतीही दान करावी पण विकत घरी आणू नये, अन्यथा शनिदोष होऊ शकतो. मात्र अपवाद आहे, घोड्याची!
शनिवारी घोड्याची नाल दाराला लावल्याने अनेक लाभ होतात. घराची आर्थिक स्थिती सुधारते. तसेच नकारात्मक लहरींपासून घराचे संरक्षण होते. वास्तू दोष दूर होतात आणि घरात सकारात्मकता वाढीस लागते.
वास्तू दोषांसाठी प्रभावी उपाय :
घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास, वास्तुदोषामुळे तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत अडकत असाल तर कार्यालय, व्यवसाय किंवा घराच्या मुख्य दाराला घोड्याची नाल लटकवू शकता. यामुळे तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल आणि तुमच्या मार्गातील अडथळेही दूर होतील.
शनि दोष दूर करण्यासाठी
जर व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर त्या व्यक्तीने झोपताना आपल्या अंथरुणाजवळ डोक्याशी घोड्याची नाल ठेवावी. याशिवाय मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. त्याचा फायदा होईल आणि शनिदोषापासून मुक्तीही मिळेल.
करिअरच्या यशासाठी : जर विद्यार्थ्याला अभ्यासात रस नसेल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यात काही अडचण येत असेल तर शनिवारी घोड्याच्या नालीपासून बनवलेली किंवा लोखंडी अंगठी मधल्या बोटात घालण्यास द्यावी. त्यामुळे मनावर संयम राहून अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत मिळेल.
आजारपणासाठी : घरातील कोणताही सदस्य आजारी पडला असेल तर घोड्याची नाल विकत आणून वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. त्यामुळे घरातील आजारपण दूर होते.
वैयक्तिक लाभासाठी : ज्योतिष शास्त्रानुसार घोड्याची नाल धारण केल्याने सुख-समृद्धी मिळते असे मानले जाते. म्हणून, जर तुम्हाला पैसा वाढवायचा असेल तर तुमच्या कष्टाला जोड देण्यासाठी तिजोरीत घोड्याची नाल ठेवा. नक्कीच फायदा होईल.