रविवारी केस कापू नये असे का म्हटले जाते? त्यामागे काही शास्त्र आहे की प्रचलित समजुती? जाणून घेऊया.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:52 PM2021-05-24T15:52:43+5:302021-05-24T15:53:05+5:30
अनेक जण सुट्टीमुळे शनिवारी किंवा रविवारी केस कापतात. परंतु तसे करणे शास्त्राला धरून नाही, असे म्हटले आहे. मग या कामांसाठी शुभ दिवस कोणता तेही पाहूया.
शनिवार-रविवारच्या सुट्टीसाठी आपली बरीचशी कामे पूर्वनिर्धारित असतात. आठवडाभर ऑफिस-व्यवसायात व्यस्त राहिल्यामुळे सुटीच्या दिवशी घराची साफसफाई करणे, नखे कापणे किंवा केस कापणे इत्यादी कामांसाठी लोक वेळ राखून ठेवतात. परंतु अनेकांकडून आपण ऐकले असेल, की शनिवारी किंवा रविवारी केस, नखे कापू नयेत. त्यामागे काय शास्त्र आहे किंवा कोणत्या प्रचलित समजुती आहेत, जाणून घेऊ.
महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगण्यात आले आहे, की रविवार हा सूर्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत रविवारी केशकर्तनामुळे संपत्ती, बुद्धिमत्ता आणि धर्म यांचा ऱ्हास होतो. परंतु अनेक जण सुट्टीमुळे शनिवारी किंवा रविवारी केस कापतात. परंतु तसे करणे शास्त्राला धरून नाही, असे म्हटले आहे. मग या कामांसाठी शुभ दिवस कोणता तेही पाहूया.
- सोमवारीसुद्धा केस कापणे चांगले मानले जात नाही. या दिवशी केस कापल्यामुळे मानसिक दुर्बलता येते. तसेच, मुलांसाठी हे चांगले नाही असे म्हणतात.
- मंगळवारी केस कापले असता आपण अकारण संकट ओढवून घेतो, असा लोकांना अनुभव आला आहे.
- केस आणि नखे कापण्यासाठी बुधवार शुभ मानला गेला आहे. या दिवशी केस आणि नखे कापल्यास धनलाभ होतो, अशी प्रचलित समजूत आहे.
- गुरुवार सुद्धा या कामांसाठी निषिद्ध मानला गेला आहे. या दिवशी केस किंवा नखे कापल्यास वित्तहानी तसेच मानहानीचे प्रसंग ओढवतात.
- या कामासाठी बुधवार प्रमाणे शुक्रवार देखील चांगला आहे. याचा संबंध शुक्र ग्रहाशी लावता येईल. कारण, हा ग्रह सौंदर्याचे प्रतीक आहे. केस कापणे आणि नखे कापणे या दोन्ही गोष्टी शरीर स्वच्छतेशी संबंधित आहेत. म्हणूनच या कामांसाठी या दोन वारांची निवड केली गेली असावी. अशा प्रकारे या दोन दिवसांमध्ये केस कापून वैयक्तिक प्रगती साधता येईल.
- शनिवार हा शनी देवांचा आणि हनुमंताचा वार आहे. त्यादिवशी या शुल्लक बाबी टाळून वेळेचा अपव्यय करू नये, तर वेळ सत्कारणी लावावा, असा शनी देवाचा कटाक्ष असतो. म्हणून शनिवारी केस कापणे टाळले जाते.