संकष्ट चतुर्थीव्रत का करावे? यासंबंधी मुद्गल पुराणात दिलेली माहिती जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:27 AM2021-09-24T09:27:09+5:302021-09-24T09:27:36+5:30
गणपति या देवतेचे मुद्गल पुराण आहे. या पुराणात चंद्रोदयकाळी भोजन करावे असे सांगितले आहे. हे भोजन म्हणजे व्रतांग भोजन आहे. व्रताची पारणा नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे.
व्रताचे दोन प्रकार आहेत. सकाम व निष्काम. गणपती ही बुद्धीची आणि विघ्नहरण करणारी देवता आहे. बुद्धी वाढण्याकरीता किंवा आपले काम, घरातील मंगलकार्य निर्विघ्न व्हावे म्हणून हे व्रत करावे. याला सकाम म्हणतात. इच्छा पुर्तीसाठी केले जाते ते सका. कामना म्हणजे इच्छा. देवतेकडून आपणास काही मिळावे अशी अजिबात इच्छा नसणे म्हणजे निष्काम.
व्रत करण्याची पद्धती मात्र दोन्हीची एकच. विनायकी चतुर्थीचे व्रत अहोरात्राचे असल्याने एकादशीप्रमाणे संपूर्ण दिवस उपास करायचा. संकष्टीचे व्रत हे पाच प्रहराचे व्रत आहे म्हणून दिवसा उपोषण करून चंद्रोदय झाल्यावर भोजन करावे. काही लोक संकष्टीला अहोरात्र उपोषण करतात, पण हे अशास्त्रीय आहे. कारण चंद्रोदय झाल्यावर भोजन करावे असा विधी आहे. विधीचे पालन करावे लागते.
गणपति या देवतेचे मुद्गल पुराण आहे. या पुराणात चंद्रोदयकाळी भोजन करावे असे सांगितले आहे. हे भोजन म्हणजे व्रतांग भोजन आहे. व्रताची पारणा नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे.
कायिक-वाचिक-मानसिक असे तीन प्रकारानी कोणतेही व्रत करावयाचे असते. झोपून उठताच आज मी हे व्रत करीन असा मानसिक संकल्प करावा. या व्रतात पूजन-जप-स्तोत्र पाठ करावे.
अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनानी अभिषेक करून षोडशोपचार पूजा करावी. यात सायंकाळच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. दूर्वा, शमी, मंदार हे गणपतीला प्रिय आहेत. तसेच जास्वंद देकील पूजेत वाहावे. दूर्वा २१, १०८, १००८ जेवढ्या शक्य असतील तेवढ्या एक एक नाममंत्राने वहाव्यात. बाप्पाच्या पायाशी चित्त एकाग्र व्हावे, ही त्यामागील संकल्पना आहे.
संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, त्याबाबत एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते; ती अशी...
गणपतीची बरीच स्तोत्रे गणेश कोशात दिली आहेत. त्यापैकी जी पाठ असतील ती आवर्जून म्हणावी. स्तोत्र पाठ नसतील तर 'नमोभगवते गजाननाय' या मंत्राचा जप करावा. संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी. चंद्रोदयाला चंद्राला अर्घ्यदान करून भोजन करावे. उपोषणाचे पदार्थ दिवसा एकदाच खावेत. वरचेवर खाऊ नये. अशी रितीने संकष्टीचे व्रत अंगिकारले असता आपल्या हातून यथोचित गणेश उपासना घडते.