पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:48 PM2022-04-01T22:48:04+5:302022-04-01T22:50:08+5:30

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. पण असं अन्न चुकूनही खाऊ नेय...

why should husband and wife not eat food in a plate Pitamah Bhishma had told the secret | पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

googlenewsNext

बहुतेक घरांमध्ये पती-पत्नी एकाच ताटात जेवण करतात. एका ताटात जेवण केल्याने परस्पर प्रेम वाढते, असे त्यांना वाटते. तथापि, वडीलधारी मंडळी आणि धर्मशासत्राचे जाणकारही सांगतात, की पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. पण असे का म्हटले जाते? या संदर्भात लोकांना अनेकदा माहिती नसते. खरे तर, महाभारतातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये.

पती-पत्नीने एकाताटात जेवण करू नये... -
एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते, हे मुळीच नाकारता येणार नाही. पितामह भीष्म यांनाही हे माहीत होते. पण त्यांचे म्हणणे होते, की प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये असतात. यामुळे, जर ही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील, तर पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. खरे तर, पत्नीसोबत एका ताटात जेवण केल्याने पतीसाठी, कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत तिच्याबद्दलचे प्रेम सर्वोपरि होते. यामुळे व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकत नाही. जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वोपरि झाले तर कुटुंबात विसंवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये.

कुटुंबाने सोबत बसून जेवण करायला हवे - 
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. सोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पण भावनाही प्रबळ असते. यामुळे कुटुंबाची प्रगतीही होते, असे भीष्म पितामह यांचे मत होते.
 
असं अन्न चुकूनही खाऊ नेय - 
भीष्म पितामह यांच्या मते, जर कुणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते चिखलाप्रमाणे दूषित होते. ते जनावरांना द्यायला हवे. याशिवाय, जर कुणी जेवणाच्या ताटाला पाय मारून गेले, तर अशा अन्नाला हात जोडून नमस्कार करावा व ते टाकून द्यावे. असे अन्न दारिद्र आणते.

 

Web Title: why should husband and wife not eat food in a plate Pitamah Bhishma had told the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.