विमान दुर्घटनेचा प्रसंग ओढावलेला असतानाही 'ती' छोटी मुलगी शांत का होती? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:56 PM2021-10-19T16:56:54+5:302021-10-19T16:57:29+5:30

आपण म्हणतो, की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तो विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही, तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का?

Why was 'that' little girl calm even when the plane crash was dragging on? Read this story! | विमान दुर्घटनेचा प्रसंग ओढावलेला असतानाही 'ती' छोटी मुलगी शांत का होती? वाचा ही गोष्ट!

विमान दुर्घटनेचा प्रसंग ओढावलेला असतानाही 'ती' छोटी मुलगी शांत का होती? वाचा ही गोष्ट!

googlenewsNext

महाभारतात १०० कौरवांसमोर ५ पांडवांचा विजय झाला, का? कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता. तेच जर, दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते, तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता. मात्र, दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या अठरा औक्षहणी सैन्यावर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला. याउलट अर्जुनाने, श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा, असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला.असा विश्वास असायला हवा. हेच सांगताना, साधू गौर गोपाल दास प्रभू सुंदर गोष्ट सांगतात....

एकदा एका विमानप्रवासात सगळे प्रवासी शांतपणे झोपले होते. अचानक विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेत हेलकावे खाऊ लागले. एका क्षणी तर विमान १८० अंशात आकाश-पाताळाला समांतर झाले. सर्व प्रवाशांना वाटले, पुढचा क्षण आपण बघणार नाही. सगळे आरडा- ओरड करू लागले. रडू लागले. पायलटला दोष देऊ लागले. एकूणच सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. 

मात्र, त्याच वेळी एक लहान मुलगी अजिबात भांबावून न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून लोकांकडे बघत होती आणि हसत होती. ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली. 

देवकृपेने काही क्षणातच विमान स्थिरस्थावर झाले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले गेले. सर्व प्रवासी देवाचे आभार मानत, एकमेकांचे अभिनंदन करत विमानातून उतार झाले. ती छोटी मुलगी, आपला सीट बेल्ट काढून उतरायला निघाली, तेव्हा त्या व्यक्तीने तिला थांबवून विचारले, 'बेटा, मगाशी एवढे लोक घाबरले असताना, आरडा-ओरड करत असताना, तू अगदी शांतपणे सर्वांकडे पाहत होतीस आणि नंतर काहीही न घडल्यासारखी पुन्हा पुस्तक वाचू लागलीस. तुला घडलेल्या प्रसंगाची भीती नाही वाटली?'

त्यावर ती मुलगी पुन्हा हसून म्हणाली, 'कसली भीती काका? या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत, त्यामुळे सर्वांपेक्षा जास्त, त्यांना माझी काळजी असणार आणि ते आहेत म्हटल्यावर मला काहीच नाही होणार, याची मला खात्री होती.'

याला म्हणतात विश्वास! असा विश्वास आपण देवावर दाखवतो का, हे तपासून पाहायला हवे.

Web Title: Why was 'that' little girl calm even when the plane crash was dragging on? Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.