पूजेत रेशमी वस्त्र का नेसावे आणि रेशमी आसान का घ्यावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:00 AM2021-03-23T08:00:00+5:302021-03-23T08:00:02+5:30

आपण स्वत:ला बसण्यासाठी आसन घेतो, तसे पूजेमध्ये देवालाही आसन ठेवतो.  वस्त्र घालतो. हा केवळ उपचार नाही, तर यामागे शास्त्र आहे.

Why wear silk garments in worship and why take silk aasana? | पूजेत रेशमी वस्त्र का नेसावे आणि रेशमी आसान का घ्यावे?

पूजेत रेशमी वस्त्र का नेसावे आणि रेशमी आसान का घ्यावे?

googlenewsNext

आपण दैनंदिन पूजा करताना आसन घेतो. मंत्रजप करताना आसन घेतो. जेवताना आसन घेतो. व्रत वैकल्यांच्या वेळी तर आसनाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. जसे आपण स्वत:ला बसण्यासाठी आसन घेतो, तसे पूजेमध्ये देवालाही आसन ठेवतो.  वस्त्र घालतो. हा केवळ उपचार नाही, तर यामागे शास्त्र आहे. ते शास्त्र कोणते, जाणून घेऊया. 

रेशीम विद्युतवाहक आहे. काळोखात रेशमी वस्त्रावर हात घासला तर प्रत्यक्ष वीज निर्माण झालेली दिसते. मंत्रोच्चाराने निर्माण होणारी विद्युत रेशमी आसनाने आणि रेशमी वस्त्राने वाढते आणि धारणही करून ठेवते. शिवाय रेशीम सत्वगुणोत्पादकही आहे. रेशमाप्रमाणेच ऊर्जा म्हणजे लोकरही विद्युत्पादक आहे म्हनूनच जंतुघ्नही आहे आणि मंत्रोत्पादक व मंत्रवाहकही आहे. धर्मशास्त्रात म्हटले आहे, `ऊर्जा वातेन शुघ्यति' म्हणजे लोकर केवळ वाऱ्याने म्हणजे वाऱ्यावर झटकल्यानेही शुद्ध होते. ती दररोज धुवावी लागत नाही. लोकरीचे वस्त्र उबदार असते. याचाच अर्थ ते विद्युत्पादक असते. म्हणून धर्मकर्मे, मंत्रजप, जज्ञयागादि कर्मे करताना व्याघ्याजिन, मृगाजिन, दर्भासन, रेशीम, लोकर याचे आसन यावर बसूनच ती कर्मे करावीत. म्हणजे फळसिद्धीला ती उपकारक होतात. 

म्हणून कधीही आसन घेतल्याशिवाय पूजा करू नका आणि आसन शक्यतो रेशमी कापडाचेच निवडा. तसेच शक्य असल्यास सोवळे नेसून पूजा केली असता, मंत्रोच्चारांचा परिणाम अधिक होईल आणि पूजा पूर्णत्वास जाईल. 

Web Title: Why wear silk garments in worship and why take silk aasana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.