शिशिर ऋतूमध्ये करा सूर्यनमस्काराचा संकल्प; जाणून घ्या धुंधुरमासाचं महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:41 PM2020-12-21T17:41:20+5:302020-12-21T17:49:19+5:30

२१ डिसेंबर रोजी सुरू झालेला शिशिर ऋतू १८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यानंतर ऋतुंचा राजा असणाऱ्या वसंताचे आगमन होईल. तसेच हिंदू मासाबरोबर हिंदू सणांचीही रेलचेल सुरू होईल. 

Winter ceremonies, so little to experience! | शिशिर ऋतूमध्ये करा सूर्यनमस्काराचा संकल्प; जाणून घ्या धुंधुरमासाचं महत्त्व

शिशिर ऋतूमध्ये करा सूर्यनमस्काराचा संकल्प; जाणून घ्या धुंधुरमासाचं महत्त्व

googlenewsNext

वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहेत, तर शरद, हेमंत, शिशिर ही देवांची रूपे मानली जातात. शिशिरात कडाक्याची थंडी पडते. दिवस छोटा होऊ लागतो. सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार. अशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते. पानाफुलांवरून दवाचे थेंब ओघळू लागतात. पानगळीचा मौसम सुरू झालेला असला, तरीदेखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून नवयौवनेप्रमाणे तजेलदार भासू लागते. 

शिशिर ऋतूमध्ये सूर्याचे महत्त्व अधिक जाणवू लागते. म्हणून याच काळात सूर्यपूजेशी निगडित अनेक व्रत, पूजा, उत्सव, सण साजरे केले जातात. या उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचा विधी पार पाडला जातो आणि निसर्गाशी जवळीक साधली जाते. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, रसरशीत फळे बाजारात आलेली असतात. ती पाहून आणि खाऊन तनामनाला उभारी येते. 

 हेही वाचा : हिवाळ्यात आहार कसा असावा? तर,बाप्पासारखा!

शिशिर ऋतु येताच हिवाळा अधिक गडद जाणवू लागतो. त्यालाच धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात भूक खूप लागते, परंतु पचनशक्तीचा वेग मंदावत जातो. त्यामुळे आरोग्यवर्धक आहार डोळसपणे घेतला पाहिजे, यावर आहार तज्ज्ञांचा भर असतो. मात्र, याच काळात व्यायामावर भर देण्याकडेही लक्ष दिले जाते. नवीन वर्ष, गारवा, थंडी, धुके हे सर्व निमित्त साधून प्रभात फेरीची सुरुवात होते. हा काळ आरोग्याच्या कमाईसाठी अनुकूल ठरतो. उत्तरायणाची सुरुवात झालेली असत़े  वर्षभरासाठी सूर्य नमस्काराचा संकल्प देखील केला जातो. 

याच काळात अनेक धन धान्य शेतातून घरी आलेली असतात. हे सर्व काही देवाच्या कृपेने प्राप्त झाले, या श्रद्धेने बळीराजा ते देवाला अर्पण करतो. त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले जातात. 

२१ डिसेंबर रोजी सुरू झालेला शिशिर ऋतू १८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यानंतर ऋतुंचा राजा असणाऱ्या वसंताचे आगमन होईल. तसेच हिंदू मासाबरोबर हिंदू सणांचीही रेलचेल सुरू होईल. 

या सर्व गोष्टींबरोबर इंग्रजी वर्षाची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्यामुळेही, २०२० ला निरोप देण्यासाठी लोक अगतिक झाले आहेत. त्याचवेळेस २०२१ च्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तूर्तास आपण शिशिराचे सोहळे अनुभवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करूया.

हेही वाचा : दैवत जागृत असते, की आपण? 
 

Web Title: Winter ceremonies, so little to experience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.