२०२२ हे वर्ष शनिवारी सुरू झाल्याने शनिदेव यांचे वर्चस्व वर्षभर राहील; त्यांच्या कृपादृष्टीसाठी 'हे' उपाय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:17 PM2022-01-01T15:17:49+5:302022-01-01T15:18:09+5:30
ज्यांना शनिदोषापासून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी वर्षाचा पहिला दिवस विशेष ठरू शकतो. अशा परिस्थितीत या दिवशी शनिदेवासाठी विशेष उपाय करावेत.
शनिवारपासून २०२२ हे वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षात शनीच्या राशीतही बदल होणार आहेत. शनीच्या राशीतील बदलाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडतो. अशा परिस्थितीत शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी आणि शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी १ जानेवारीचा दिवस खूप खास आहे. ज्योतिष शास्त्रानुसार २०२२ चा राजा शनिदेव राहणार आहे. ज्योतिषांच्या मते, ज्यांना शनिदोषापासून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी वर्षाचा पहिला दिवस विशेष ठरू शकतो. अशा परिस्थितीत या दिवशी शनिदेवासाठी विशेष उपाय करावेत.
२०२२ च्या पहिल्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघरात देवासमोर दिवा लावावा. यानंतर गणपतीची पूजा करावी. त्यानंतर शिवाचे ध्यान करताना १०८ वेळा 'ॐ नमः शिवाय' हा जप करावा. मंदिरात जाणे शक्य असल्यास तेथे जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे. शिवलिंगाला जल अर्पण करून महामृत्युंजय मंत्र - ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ,उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || या मंत्राचा किमान ११ वेळा जप करावा. अशाप्रकारे केलेली शिवपूजा शनिदेवाला प्रिय असते.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी १ जानेवारीला सायंकाळी देवघरात राईच्या तेलाचा दिवा लावा. तसेच या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळी छत्री, लोखंड इत्यादींचे दान करावे. याशिवाय संध्याकाळी शक्य झाल्यास शनि मंदिरात जाऊन किंवा घरी ‘ओम शं शनिश्चराय नमः’ चा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मंत्राचा जप करू शकता.
आजच्या दिवशी तेलाचे दान करा. हे दान करताना एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. यानंतर हे तेल एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. असे शास्त्र सांगते. याशिवाय मारुती रायाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. मारुती रायाच्या पुजेनेही शनिदेवाचा प्रकोप कमी होतो असे मानले जाते.