Yearly Horoscope 2022: वार्षिक राशीभविष्य २०२२: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं आहे वर्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 08:24 AM2022-01-01T08:24:31+5:302022-01-01T08:27:07+5:30
Varshik Rashi Bhavishya 2022: सन २०२२ वर्ष कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात लाभदायक आणि यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी...
मेष: मेष राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे ठरू शकेल. वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीत अचानक धनलाभ होऊ शकतात. एप्रिल महिन्यानंतर नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पितृपक्षात चांगली बातमी मिळू शकते. एप्रिल महिन्यानंतर नशिबाची साथ... अधिक वाचा
वृषभ: सन २०२२ हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी जीवनातील अन्य बाबींसाठी सामान्य असले, तरी करिअरच्या बाबतीत अफलातून प्रगती करणारे ठरू शकेल. नोकरदारवर्ग वरिष्ठांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील. बचत आणि धनसंचयाच्या योजना यशस्वी होऊ शकतील. जीवनाच्या बऱ्याच क्षेत्रात अपार यश... अधिक वाचा
मिथुन: सन २०२२ हे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्ट्या सामान्य असू शकेल. शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना विशेष शुभ फळे मिळतील. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. कुटुंबाची सकारात्मक साथ लाभेल. जोडीदाराशी असलेले संबंध मधुर होतील. प्रेम विवाहाचा विचार... अधिक वाचा
कर्क: सन २०२२ हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे ठरू शकेल. आगामी वर्ष करिअर, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शुभ परिणाम देणारे ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर शुभ परिणाकारक आणि लाभदायक प्राप्त होऊ शकतील. धनसंचय वाढू शकेल. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम... अधिक वाचा
सिंह: सन २०२२ हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चांगले जाणार आहे. आर्थिक, करिअर, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्वोत्तम परिणाम मिळतील. विद्यार्थीवर्गासाठी सन २०२२ हे वर्ष उत्तम परिणाम देणारे ठरू शकेल. चिंतामुक्तीमुळे आनंद द्विगुणित होऊ शकेल. मन प्रसन्न राहील. अनेक मार्गांनी गुप्त धन... अधिक वाचा
कन्या: कन्या राशीसाठी सन २०२२ हे वर्ष सामान्यपेक्षा चांगले जाणार आहे. कारकीर्द, आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात संमिश्र परिणाम मिळतील. वर्षाच्या मध्यावर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवू शकाल. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आपले पैसे गुंतवा. नोकरदार मेहनतीने काही नवीन स्त्रोतांमधून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील. अधिक वाचा
तूळ: तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ हे वर्ष करिअरच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. व्यवसायात नवनवीन संधी निर्माण होतील. एप्रिल महिन्यानंतर नोकरदारांना चांगला काळ सिद्ध होऊ शकतो. धार्मिक यात्रेवर जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे फळ तुम्हाला या वर्षी नक्की मिळेल. अधिक वाचा
वृश्चिक: सन २०२२ हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष संमिश्र असेल. या वर्षी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार आयुष्यात चमकदार कामगिरी करतील. या वर्षी तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर मिळण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींचा तुम्हाला सहवास लाभेल. अधिक वाचा
धनु: सन २०२२ वर्षाच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकेल. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कौशल्य सिद्ध करू शकाल. नशिबाची साथ मिळू शकते. प्रतिस्पर्ध्यांवर आणि विरोधकांवर वर्चस्व गाजवू शकाल. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला व्यवसायिकांना मोठे लाभ मिळू शकतील. अधिक वाचा
मकर: मकर राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ ची सुरुवात चांगली राहील. संपूर्ण वर्षासाठी आपल्या खर्चाचे नियोजन आणि पैशाची बचत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. करिअर किंवा नोकरी बदलण्यास इच्छुक असलेल्यांना उत्तम संधी मिळतील. या वर्षी कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर अनेक क्षेत्रात यश... अधिक वाचा
कुंभ: सन २०२२ हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अधिक अनुकूल राहील. आर्थिक दृष्टीने ही हे वर्ष तुम्हाला अपार यश देणारे ठरू शकेल. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश लाभू शकेल. थोडे धीराने, धैर्य ठेवत आणि समजुतीने निर्णय घ्यावे, असा सल्ला दिला जात आहे. अधिक वाचा
मीन: मीन राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ हे वर्ष अनुकूल राहील. करिअरच्या दृष्टीने मीन राशीतील व्यक्तींच्या इच्छेनुसार परिणाम प्राप्त होऊ शकतील. नोकरीत पदोन्नती आणि वेतन वृद्धी होऊ शकेल. उत्तम प्रदर्शन करून आपल्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात यशस्वी होऊ शकतील. आगामी वर्षात आर्थिक आघाडीवर संपन्न... अधिक वाचा