पारलौकिक जगताची दृष्टी अर्थात सिक्स्थ सेन्स तुम्हीही जागृत करू शकता; कसे ते बघा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 02:03 PM2022-02-10T14:03:54+5:302022-02-10T14:04:19+5:30

केवळ एकांत मिळून सिक्थ सेंस जागृत होणार नाही, तर त्यासाठी योग्य प्रकारे योग प्रशिक्षण मिळणेही गरजेचे आहे.

You too can awaken the vision of the transcendental world, the Sixth Sense; See how ... | पारलौकिक जगताची दृष्टी अर्थात सिक्स्थ सेन्स तुम्हीही जागृत करू शकता; कसे ते बघा... 

पारलौकिक जगताची दृष्टी अर्थात सिक्स्थ सेन्स तुम्हीही जागृत करू शकता; कसे ते बघा... 

Next

बायकांना स्किस्थ सेंस असतो असे म्हणतात. सिक्थ सेंस अर्थात सहावे इंद्रिय, जे आपल्याला भविष्यातील गोष्टी, घटना, व्यक्ती, प्रसंग घडणार असल्यास त्याची पूर्वकल्पना देते. परंतु, हे इंद्रिय केवळ बायकांनाच नाही, तर पुरुषांनाही असते. फक्त ते जागृत अवस्थेत असेल, तरच त्याचा वापर योग्य प्रकारे होऊ शकतो. वेद, योग उपनिषदातही सहावे इंद्रियाचा उल्लेख केलेला आहे. चला तर जाणून घेऊया, हे इंद्रिय जागृत कसे करतात.

कपाळावर दोन्ही भुवयांच्या मध्यभागी एक छिद्र असते, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. हे छिद्र सुषुन्मा नाडीशी जोडलेली असते आणि ती शेवटी मूलाधार चक्राकडे नेते. या नाडीच्या उजव्या बाजूला इडा आणि डाव्या बाजूला पिंगला नाडी असते. त्या सुप्तावस्थेत असल्यामुळे सहावे इंद्रियदेखील सुप्त अवस्थेत असते. 

सिक्थ सेंस जागृत करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे तीन महिन्यांसाठी कुटुंब आणि एकूणच भौतिक जगापासून स्वत:ला दूर ठेवून योगसाधनेला शरण जावे. यम, नियम, प्राणायाम करत ध्यानधारणेत मन तल्लीन होते आणि आपोआप सिक्थ सेंस जागृत होतो. 

प्राणायामाने सहावे इंद्रिय जागृत करता येते. त्यासाठी अपेक्षित एकांत हवा. तेव्हाच मन इतर विषयातून मुक्त होऊन एकाग्र होण्यास मदत होईल. म्हणूनच पूर्वीचे साधु ऋषी मुनी अरण्यात जाऊन तपश्चर्या करत असत़  तपश्चर्या म्हणजेच प्राणायाम, ध्यानधारणा. त्यामुळेच त्यांच्या वाणीवर प्रभुत्त्व येत असे. ते भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा अचूक वेध घेऊ शकत असत.

सद्यस्थितीत अरण्यात जाऊन ध्यानधारणा करावी, अशी परिस्थिती नाही. तसेच प्रापंचिक जबाबदाऱ्या बाजूला सारून अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग निवडणेही कठीण आहे. दोन्हीचा मध्य गाठण्यासाठी योग शिबीरांची, योग केंद्राची निवड करता येईल. 

तसेच योगसाधना करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाचीदेखील गरज असते. प्राणायाम, त्राटक, ध्यानधारणा करताना चूका करून चालणार नाही. अन्यथा योग्य परिणाम तर मिळणार नाहीच, शिवाय उलट परिणाम देखील भोगावे लागतील. 

म्हणून केवळ एकांत मिळून सिक्थ सेंस जागृत होणार नाही, तर त्यासाठी योग्य प्रकारे योग प्रशिक्षण मिळणेही गरजेचे आहे. तो योग जुळून आला, तर भूत-भविष्य-वर्तमानाचा वेध घेणे तुम्हालाही नक्कीच सोपे होईल.

Web Title: You too can awaken the vision of the transcendental world, the Sixth Sense; See how ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.