तुमची जन्मतारिख सांगते तुमचा स्वभाव, आरोग्य आणि भविष्य- गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 03:20 PM2021-02-22T15:20:47+5:302021-02-22T15:21:21+5:30
तुमची जन्मतारीख काय ते पहा आणि आपला स्वभाव ताडून पहा.
जन्मतारखेवरून मूलांक कळतो आणि मूलांकाच्या आधारे भविष्य. अंकशास्त्रानुसार एक ते नऊ मूलांकांमध्ये जे वैविध्यपूर्ण लोक अखिल विश्वासत सामावले आहेत, त्यांचा परिचय करून घेऊ. मार्गदर्शन करत आहेत, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे
१,१०,१९,२८ या तारखेला जन्म घेणारे लोक, त्यांचा शासक ग्रह सूर्य आहे. यांना वातप्रकृतीचा त्रास होतो. पित्ताचा उपद्रव होतो. उष्ण प्रकृती असते. स्वभाव अतिशय सरळ असतो. त्यांनी माणिक वापरायला हरकत नाही.
२, ११, २० हे लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांना दु:खं पाहवत नाही आणि सहनही होत नाही. त्यांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न मोती आहे. उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत घालावा. त्यामुळे स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा होत नाही.
३, १२, २१, ३० या तारखांचा शासक ग्रह गुरु आहे. त्यांचे रत्न पुष्कराज आहे. पुष्कराज सोन्याच्या अंगठीतून घालावा. गुरुचे पाठबळ लाभल्यावर सर्व क्षेत्रात त्यांची आघाडी दिसून येते.
४, १३, २२, ३१ या तारखांचे लोक टोकाचे आस्तिक नाहीतर टोकाचे नास्तिक असतात. पाठ दुखणे, छाती दुखणे, वाताचे विकार त्यांना होतात. या लोकांनी चिंतनावर अधिक भर दिला पाहिजे.
५,१४,२३ जन्मतारिख असणारे लोक अतिशय हुशार असतात. परंतु, हे लोक पटकन नाराज होतात. त्यांना अपमान सहन करता येत नाही. सतत सर्दीने बेजार असतात. त्यांचा स्वामी आहे बुध आणि बुधाचे रत्न आहे पाचू. अशा लोकांनी पाचू धारण करण्याआधी तो नीट पारखून घ्यावा. या जन्मतारखेच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडावी. तसेच त्यांना कायदेविषयातही गती प्राप्त होईल.
६,१५,२४ जन्मतारिख असणारे लोक राजेशाही असतात. उच्च राहणीमान त्यांना आवडते, मात्र कामाच्या बाबतीत अतिशय आळशी असतात. छोटेसे काम करायलाही पुष्कळ विलंब लावतात. एखाद दिवशी काम करतील, तर दुसऱ्या दिवशी अजिबात काम नाही, एवढा सुस्तपणा त्यांच्यात असतो. या स्वभावात भर म्हणजे, चटपटीत आणि गोड पदार्थांचे सेवन त्यांना आणखी आळशी बनवते. परंतु या तारखेचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सौंदर्याचा उपासक आहे. त्यामुळे आळशी असूनही या लोकांमध्ये नीटनेटकेपणा आणि शानशौकीची आवड दिसून येते. शुक्राचे रत्न हिरा आहे. तो परिधान केला असता, या लोकांचे भाग्य हिऱ्यासारखे उजळते.
७,१६,२५ या जन्मतारखेच्या व्यक्ती पुनर्जन्म म्हणून जन्माला आलेल्या आहेत. चविष्ट पदार्थ आवडतात. वयाच्या ३५ नंतर पोटाचे त्रास. त्यांना अनेक स्वप्न पडतात, त्यापैकी अनेक स्वप्न खरी होतात. लागणे, भाजणे, चिरणे या गोष्टी वारंवार घडतात.
८,१७,२६ जन्मतारिख असणाऱ्या लोकांचा स्वामी शनि आहे आणि शनिचे रत्न निलम आहे. या लोकांच्या वाट्याला बालपणापासून दुखापती फार. गुडघेदुखी, पायदुखी, डोकेदुखीचे सतत त्रास होतात. हे हाडाचे इंजिनिअर असतात. तंत्र, यंत्र, उपकरण, स्थापत्य, अभियंता होतात.
९,१८,२७ जन्मतारिख असणारे लोक मंगळाच्या प्रभावाखाली असतात. मंगळाचे रत्न पोवळे आहे. त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. त्यांनी पोवळ्याचा वापर केला पाहिजे. कोणत्याही मंगळवारी पोवळे धारण करावे. पोवळे देवीचे रत्न आहे. सर्व भगिनींनी त्याचा वापर करावा, अवश्य लाभ होता़े युद्ध, पराक्रम, भांडण यांचा शासक ग्रह मंगळ आहे. त्यामुळे हे लोक नेहमी नेतृत्वात पुढे असतात. त्यांच्या ठायी पराक्रम असतो, परंतु त्यांनी भावनांवर, रागावर आवर घालण्यासाठी पोवळ्याचा वापर करावा.