याच सरोवरावर युधिष्ठिराला विचारले होते यक्षप्रश्न; पाकिस्तानातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या भागात स्थित आहे ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:50 PM2022-02-23T17:50:21+5:302022-02-23T17:51:29+5:30

लोककथेनुसार हे प्रार्थनास्थळ हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की ते श्रीकृष्णाने बांधून घेतले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांनी केली होती.

Yudhishthira was asked Yakshaprasna on this lake; Read where Hindu pilgrimage sites are located in Pakistan! | याच सरोवरावर युधिष्ठिराला विचारले होते यक्षप्रश्न; पाकिस्तानातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या भागात स्थित आहे ते वाचा!

याच सरोवरावर युधिष्ठिराला विचारले होते यक्षप्रश्न; पाकिस्तानातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या भागात स्थित आहे ते वाचा!

Next

कटास राज हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या उत्तरेकडील चकवाल जिल्ह्यातील पोतोहर पठारातील नमक कोह पर्वत रांगेत असलेले हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिराशिवाय इतरही मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरे दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. माता पार्वती जेव्हा सती झाली तेव्हा भगवान शंकराच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे सरोवर तयार झाले असे पौराणिक कथेत सांगितले जाते. अलीकडेच पाकिस्तानी कोर्टाने कोरड्या पडणाऱ्या सरोवरांबद्दल चिंता व्यक्त केल्याने हे ठिकाण चर्चेत आले. 

या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे

लोककथेनुसार हे प्रार्थनास्थळ हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की ते श्रीकृष्णाने बांधून घेतले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांनी केली होती. मौर्य सम्राट अशोकानेही या ठिकाणी स्तूप बांधला होता, त्याचप्रमाणे चौथ्या शतकात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी फाहिन यानेही आपल्या प्रवासवर्णनात या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. हे ठिकाण शीख गुरू नानक देवजी यांनाही अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्याच्या आजूबाजूला उत्खनन करताना, सहा ते सात इसवीसनपूर्व काळातील संस्कृतींचे अवशेष सापडले आहेत.

येथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला 

असे म्हणतात की महाभारत काळात पांडव वनवासाच्या काळात या डोंगरांवर आले होते आणि हा तो तलाव आहे जिथे पांडव तहानलेले असताना पाण्याच्या शोधात पोहोचले होते. तलावावर यक्षाचा अधिकार होता. जेव्हा नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन असे चार भाऊ पाण्याच्या शोधात या तलावावर आले तेव्हा यक्षाने त्यांना बोलावून सांगितले की, या पाण्यावर आपला अधिकार आहे, जर त्याला पाणी घ्यायचे असेल तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पांडवांपैकी  युधिष्ठिर वगळता कोणीही त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही आणि जेव्हा त्यांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा यक्षाने त्यांना बेशुद्ध केले. शेवटी चार भावांचा शोध घेत युधिष्ठिर तिथे पोहोचला आणि चारही भावांना बेशुद्ध पडलेले पाहून विचारले की हे कोणी केले, तेव्हा यक्षाने सर्व प्रकार सांगितला, तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की ते उत्तर द्यायला तयार आहेत. तेव्हा यक्षाने त्याला प्रसिद्ध प्रश्न विचारले आणि युधिष्ठिराने अचूक उत्तर दिल्यावर यक्षाने चार भावांना शुद्धीवर आणले आणि त्या सरोवराला धर्मराजाचे नाव दिले.

Web Title: Yudhishthira was asked Yakshaprasna on this lake; Read where Hindu pilgrimage sites are located in Pakistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.