या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 05:33 PM2022-06-11T17:33:32+5:302022-06-11T19:30:35+5:30
Zodiac Sign For love: राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जाणण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, त्याची राशीच पुरेशी आहे. राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते. आज आपण अशा राशींसंदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यांना खरे प्रेम मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.
या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम -
तूळ राशी - शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला लव्ह, रोमान्स, लक्झरी, ऐशो-आराम इत्यादींचा कारक मानले जाते. ही राशी अग्नि तत्वाची राशी आहे. याचबरोबर, ही राशी शनी देवालाचीही अत्यंत प्रिय राशी असल्याचे मानले जाते. यामुळे या राशीच्या लोकांना नियम आणि शिस्त अत्यंत आवडते. अनेक वेळा या लोकांना खरे प्रेम मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणींचाही सामना करावा लागतो. कारण या राशीच्या लोकांना शनिदेव मेहनत केल्यानंतरच फळ देतात.
मकर राशी - ही राशी देखील शनीदेवाची राशी आहे. शनीदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे शुभ अथवा अशुभ फळे देतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांनाही प्रेमासाठी अत्यंत संघर्ष करावा लागतो. मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ असल्यास, त्यांच्या प्रेम संबंधात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. यामुळे, शनीदेवाच्या शुभ प्रभावासाठी त्यांची पूजा करायला हवी आणि चुकीच्या संगतीपासून दूर रहायला हवे.
कुंभ राशी - ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील 11वी रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेवांचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे. शनिदेवाला न्याय देवता आणि कर्म फलदाता म्हणूनही संबोधले जाते. यामुळे, जेव्हा या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव अशुभ स्थानात असतात तेव्हा त्यांना आपले प्रेम मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. खरे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना अत्यंत संघर्ष करावा लागतो.
(टीप - येथे देण्यात आलेली माहिती सर्वसामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी करत नाही.)