बटन दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान; गोंदिया-भंडारा लोकसभा फेरमतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:40 AM2018-05-30T10:40:11+5:302018-05-30T10:40:21+5:30
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्समधे सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. ३० मे रोजी येथे पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच कित्ता गिरवला जात असल्याच्या बातम्या येणे सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्समधे सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. ३० मे रोजी येथे पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच कित्ता गिरवला जात असल्याच्या बातम्या येणे सुरू झाले आहे. गोंदियाच्या ३१ केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे.गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. बटण दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान होत आहे. २३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील प्रकार घडला आहे.सोबतच कामठा येथील ११७ क्रमांकाच्या बुथवर सुध्दा व्हीव्हीपीटी काम करीत नसल्याची माहिती आहे.
सोमवारी येथे झालेल्या मतदानात ईव्हीएम मशीन्स नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ४९ मतदान केंद्रांवर फेरमतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मतदानासाठी आज येथे शासकीय सुटीही जाहीर करण्यात आली आहे.