युगांधर मिशन ऑफिसरचे १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:50+5:302021-09-16T04:43:50+5:30
दोन वर्षांपासून युगांधर समूहातर्फे या परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात येत असून पहिल्याच वर्षी चार आणि यावर्षी १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ...
दोन वर्षांपासून युगांधर समूहातर्फे या परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात येत असून पहिल्याच वर्षी चार आणि यावर्षी १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. एकूण ३० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये जय बांडेबुचे, पवन नेरकर, आकांक्षा माने, चैतन्य शरणागत, ऋत्विक बागडे, सलोनी निमजे, पीयूष राऊत, स्वाती आंबेडारे, प्रतीक्षा कांबळे, मृणाली गजबे यांचा समावेश आहे. स्थानिक गुरुदेव मंगल कार्यालयात या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, सिहोराचे ग्रामसेवक मेघराज हेडावू, युगांधर समूहाचे मार्गदर्शक व्यवसायी गोपाल येळे, युगांधर समूहाचे अध्यक्ष विद्याधर तुरकर, उपाध्यक्ष शरद खेताडे, संचालक प्रकाश हेडावू, इमरान सुमारवाला, महेश कामथे, राजेश भगत, रवी धकाते, राहुल जुवारे, पत्रकार जितेंद्र पटले, प्रा. मुकुंदा जुवारे, मंगेश सहारे, दिनेश पेरे, सुनील कोहळे, प्रवीण पारधी, हेमकांत बुरडे, पपिकांत मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.