भंडारा, साकोली उपविभागात १०१ पदे रिक्त

By Admin | Published: February 7, 2016 01:25 AM2016-02-07T01:25:27+5:302016-02-07T01:25:27+5:30

साकोली उपविभागातील ४६ व भंडारा उपविभागातील ५५ रिक्त पोलीस पाटील पदाची गावनिहाय आरक्षण सोडत ८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, साकोली व भंडारा येथे दुपारी २ वाजता होणार आहे.

101 posts vacant in Bhandara, Sakoli subdivision | भंडारा, साकोली उपविभागात १०१ पदे रिक्त

भंडारा, साकोली उपविभागात १०१ पदे रिक्त

googlenewsNext

८ फेब्रुवारीचा मुहूर्त : पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत
भंडारा : साकोली उपविभागातील ४६ व भंडारा उपविभागातील ५५ रिक्त पोलीस पाटील पदाची गावनिहाय आरक्षण सोडत ८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, साकोली व भंडारा येथे दुपारी २ वाजता होणार आहे.
रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरिता मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलीत तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावातील लोकसंख्येनुसार करावयाची आहे, उपविभागीय दंडाधिकारी तथा पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डी.पी. तलमले व डॉ.संपत खिलारी यांनी कळविले आहे. साकोली तालुक्यातील महालगाव, पिंडकेपार, गिरोला, सुकळी, सानगाव, विहिरगाव / बु., कुंभली, सिरेगावटोला, खैरी, किन्ही / ए. साखरा, घानोड, परसटोला, निपरटोला, बरडकिन्ही या १५ व लाखनी तालुक्यातील रेंगेपार/को., सोनेखारी, मासलमेटा, दिघोरी / ना., सिपेवाडा, खराशी, सोनमाळा, मिरेगाव, चान्ना/धा., मेंढा/पो., चिखलाबोडी, खुर्शीपार, लोहारा, मऱ्हेगाव, मुरमाडी/तुप., पहाडी या १६ आणि लाखांदूर तालुक्यातील मेंढा, घरतोडा, डोकेसरांडी, चिचोली/खु., इटान, दांडेगाव, आथली, बोरगाव, बोथली, हरदोली, खैरना, खैरीपट, खोलमारा, नांदेड, तावशी या १५ असे एकूण ४६ रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांचा समावेश आहे.
भंडारा तालुक्यातील मारेगाव, जमनी, कोरंभी, मुजबी, जाख, पांढराबोडी, सिरसी, चिखली ज.न., कारधा, आंबाडी, सिरसघाट, डव्वा, मथाडी, सालेबर्डी, नवेगाव, किटाळी, गोलेवाडी, इटगाव, चिखल पहेला, उसरीपार, खापा ज., डोंगरगाव या २२ व पवनी तालुक्यातील कोरंभी, कोदुर्ली, गुडेगाव, वाही, कन्हाळगाव, शेळी, सिंधी, भुयार, येरवा, सिंधपुरी, धाकोंडी, ठाणेगाव, खाकशी, ठाणा, परसोडी, धामनी, रनाळा, खोकरी - ढोरप, काकेपार, खापरी (भु), बाचेवाडी नेरला, शेंदरी बु., फनोली, सोनेगाव बु., कोंढा, सौंदड, सालेवाडा, सोमनाळा खुर्द, तिर्री, नवेगाव ठाणा, विरली खांदार, अत्री अशा ३३ पदांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 101 posts vacant in Bhandara, Sakoli subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.