जिल्ह्यात १०१० काेराेना ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:59+5:302021-03-23T04:37:59+5:30

साेमवारी १०७१ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ६३, माेहाडी ४, तुमसर २, पवनी १२, लाखनी २२, ...

1010 active patients in the district | जिल्ह्यात १०१० काेराेना ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात १०१० काेराेना ॲक्टिव्ह रुग्ण

Next

साेमवारी १०७१ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ६३, माेहाडी ४, तुमसर २, पवनी १२, लाखनी २२, साकाेली ७ आणि लाखांदूर तालुक्यात २ असे ११२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६१ हजार व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात १५ हजार २०४ व्यक्ती काेराेना बाधित आढळून आले. त्यापैकी १३ हजार ८६३ व्यक्तींनी काेराेनावर मात केली आहे तर ३३१ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात काेराेना लसीकरण वेगाने सुरु असून काेराेना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययाेजना करीत आहे.

बाॅक्स

साकाेली तालुक्यात महिलेचा मृत्यू

साकाेली तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेचा काेराेनाने साेमवारी मृत्यू झाला. आता जिल्ह्यात मृतांची संख्या ३३१ वर पाेहाेचली आहे. जिल्ह्यात मृत्यूदर अत्यल्प असून ही समाधानाची बाब आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठी उपचार सुविधा देण्यात येत आहे.

Web Title: 1010 active patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.