दहाव्या दिवशी आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:44 PM2018-04-20T22:44:41+5:302018-04-20T22:45:17+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचा-यांनी अकरा महिण्यांचे पूनर्नियुक्ती आदेश, समान काम, समान वेतन व विविध न्यायीक मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून सुरू केलेले सुरू कामबंद आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचा-यांनी अकरा महिण्यांचे पूनर्नियुक्ती आदेश, समान काम, समान वेतन व विविध न्यायीक मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून सुरू केलेले सुरू कामबंद आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे.
जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी भेट दिली. न्यायीक मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलनाला विविध संघटना व अधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. उदया शनिवारला राज्यस्तरावर आरोग्य कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
विविध मागण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र जिल्हा शाखा भंडारा यांनी, ११ एप्रिल पासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाभरातील नर्सपासून तर वैदयकीय अधिका-यांपर्यंत अधिकारी-कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक अधिकारी -पदाधिकारी यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला आहे. शुक्रवारला महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ भंडारा यांनी, आंदोलनाला भेट दिली व पाठिंबा जाहिर केला. गुरूवारला आमदार रामचंद्र अवसरे यांनी, आंदोलनाला भेट दिली. आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यां विस्तृतपणे जाणून घेतल्या. यावेळी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे संदर्भ देत शासनाने समान काम समान वेतनाची मागणी यावेळी केली. याप्रसंगी आमदार अवसरे यांनी, ज्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या रास्त मागण्यां शासनाने तत्काळ सोडवाव्या याकरिता लक्ष घालणार असल्याचे त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना, जिल्हा संघटनेनेच्या वतीने न्यायीक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासना तर्फे आरोग्य कर्मचा-यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे अभिवचन मा. जिल्हाधिका-यांनी दिले. सोईओ मनोजकुमार सुर्यवंशी यांनी, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आरोग्य सेवतील कर्मचा-यांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शासन याकडे गांभियार्ने लक्ष घालत नसल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने काल गुरूवारला घेतली. समितीचे अध्यक्ष आरोग्य समितीचे सभापती प्रेम वनवे, सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर व अन्य सदस्यांनी आंदोलनाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.