जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू, ९८४ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:04+5:302021-04-11T04:35:04+5:30
जिल्ह्यात शनिवारी ६,४८७ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ३८९, माेहाडी १०५, तुमसर १५९, पवनी १३७, लाखनी ...
जिल्ह्यात शनिवारी ६,४८७ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ३८९, माेहाडी १०५, तुमसर १५९, पवनी १३७, लाखनी ४६, साकाेली ७७, लाखांदूर तालुक्यात ७१ असे ९८४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २६ हजार ८०५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १७ हजार २९४ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत.
शनिवारी भंडारा तालुक्यात सात, लाखनी तालुक्यात दोन, पवनी व माेहाडी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा काेराेनाने मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील ५२ वर्षीय, ५९ वर्षीय, ४० व ५५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात मृत्यू झाला, तर ६५ वर्षीय पुरुषाचा काेराेनाने घरीच मृत्यू झाला. ४९ वर्षीय पुरुष व ६६ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लाखनी तालुक्यातील ६५ व ६६ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर पवनी तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष आणि माेहाडी तालुक्यातील ५५ वर्षीय व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आता काेराेना बळींची संख्या ४०५ झाली आहे.
जिल्ह्यात ९,१०६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून ९ हजार १०६ रुग्ण सद्यस्थितीत आहेत. भंडारा तालुक्यातील ३,६१७, माेहाडी १,०६४, तुमसर १,३६६, पवनी १,१६४, लाखनी ९४३, साकाेली ५३८, लाखांदूर ९१४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहेत.
५५३ व्यक्ती काेराेनामुक्त
शनिवारी जिल्ह्यात ५६३ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्याही माेठी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार २९४ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे.