रेतीचे अवैध ११ टिप्पर व चार ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:58 PM2018-12-27T21:58:45+5:302018-12-27T21:59:01+5:30

रेती अवैध वाहतूक करणाऱ्या ११ टिप्परसह चार ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पथकाने तुमरस ते भंडारा मार्गावर कारवाई करून गुरुवारी पहाटे ५ पकडले. टिप्पर चालकाजवळ मध्यप्रदेशातील वाहतूक परवाना आढळल्याने तो बनावट असण्याचा संशय पोलिसांना आहे. एलसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

11 illegal tufters and four tractors seized in the sand | रेतीचे अवैध ११ टिप्पर व चार ट्रॅक्टर जप्त

रेतीचे अवैध ११ टिप्पर व चार ट्रॅक्टर जप्त

Next
ठळक मुद्देएलसीबीची तुमसर येथे कारवाई : मध्यप्रदेशातील टीपी बनावट असण्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेती अवैध वाहतूक करणाऱ्या ११ टिप्परसह चार ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पथकाने तुमरस ते भंडारा मार्गावर कारवाई करून गुरुवारी पहाटे ५ पकडले. टिप्पर चालकाजवळ मध्यप्रदेशातील वाहतूक परवाना आढळल्याने तो बनावट असण्याचा संशय पोलिसांना आहे. एलसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असताना महसूल विभाग मात्र कोणतीच करवाई करताना दिसत नाही. अखेर आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा मार्गावर पहाटे ५ वाजता धाड मारून कारवाई केली. त्यावेळी टिप्पर क्र. एमएच ४९ टी ३३०३, एमएच ३६ एफ ८७८७, एमएच ४० एके ७५५३, एमएच ३६ एफ २०५०, एमएच ३१ सीक्यू. ७१६४, एमएच ३६ एफ १८०२, एमएच ३६ जी ८७००, एमएच ३४ एबी ५४४८, एमएच ४० बीजी २३५३, एमएच ४९ एटी ३१३२ यांना रेती वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले. तुमसर पोलीस ठाण्याच्या परिसरात जागेअभावी तुमसर बसस्थानक कार्यशाळेमागील परिसरात उभी करण्यात आली आहेत. यातील काही टिप्परमधून पाण्याची गळती सुरु होती. ओली रेती टिप्परमध्ये भरण्यात आली.
तुमसर तालुक्यातील रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर क्र. एमएच ३६ झेड ०९३४, एमएच ३४ एल ८०२०, एम् एच ३५ जी ९१११ व एमएच ३५ जी ६७३७ यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात सदर ट्रॅक्टर उभी करण्यात आली आहेत.
सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पोटे, सहाय्यक उपनिरिक्षक प्रितीलाल रहांगडाले, पोलीस शिपाई सुधीर मडामे, कौशीक गजभिये यांच्या पथकाने केली. सदर वाहनचालकाजवळ मध्यप्रदेशातील टीपी आढळली. टीपीची सध्या तपासणी व चौकशी सुरु आहे. भंडारा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सदर धडक मोहीम राबविली. तुमसर येथील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमानुसार सर्वप्रथम महसुल विभागने चौकशी करणे व कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु महसुल प्रशासन रेती प्रकरणात कारवाई करतांनी दिसत नाही.

Web Title: 11 illegal tufters and four tractors seized in the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.