ट्रॅक्टर उलटून ११ मजूर जखमी
By admin | Published: May 31, 2016 12:40 AM2016-05-31T00:40:00+5:302016-05-31T00:40:00+5:30
देव्हाडा नरसिंगटोला येथील तलाव खोलीकरण व ट्रॅक्टरने गाळ वाहतुकीच्या कामावरील मजूर मातीने भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून घराकडे जात असताना...
देव्हाडा येथील घटना : काही जखमींना भंडारा तर गंभीर जखमींना नागपूरला हलविले
तुमसर / करडी : देव्हाडा नरसिंगटोला येथील तलाव खोलीकरण व ट्रॅक्टरने गाळ वाहतुकीच्या कामावरील मजूर मातीने भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून घराकडे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने ११ जण जखमी झाले. सदर घटना आज सोमवारला दुपारी ११ वाजतादरम्यान वैनगंगा साखर कारखान्यासमोरील चढावावर घडली. सर्व जखमींना ग्रामपंचायतीने स्वत:च्या खर्चाने दवाखान्यात हलविण्यात आले. यातील दोन गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा / नरसिंगटोला येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण व ट्रॅक्टरने गाळ वाहतुकीचे काम हाती घेण्यात आले. कामांवर नरसिंगटोला येथील मजूर कार्यरत आहेत. खोलीकरणातील माती आठवडी बाजारातील खड्डे बुजविण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करण्यात येत आहे.
सकाळी ७ वाजता कामावर येणाऱ्या मजुरांना दुपारी ११ वाजता जेवणाची सुटी दिली जाते. दि. ३० मे रोजी दुपारी हौशीलाल सुखलाल लाळे रा.नरसिंगटोला यांच्या ट्रॅक्टरची शेवटची ट्रीप असल्याने मजूर घरी जाण्यासाठी उशिर होऊ नये यासाठी माती भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसले. वैनगंगा साखर कारखान्यासमोरील चढ भागाावर येताच ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. यात ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने ११ मजूर जखमी झाले. यात १० स्त्रिया तर १ पुरुषाचा समावेश आहे. घटनेची माहिती होताच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी घटानस्थळी पोहचले. जखमींना ग्रामपंचायतीने स्वखर्चातून वाहनांद्वारे दवाखान्यात हलविण्यात आले. जखमींपैकी ६ तुमसर, ३ भंडारा तर दोघींच्या हाता-पायाला व डोळ्याला गंभीर इजा असल्याने जोखम राहू नये यासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)