११ लाखांची मजुरी अडली
By admin | Published: December 25, 2014 11:27 PM2014-12-25T23:27:05+5:302014-12-25T23:27:05+5:30
जिल्ह्यातील तालुका कृषी बीज गुणन केंद्र आणि नर्सरी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोन वर्षांपासून सुमारे ११ लाख ११ हजार रूपयांची मजुरी अडली आहे. दरवेळी पुरक मागणी केल्यानंतरही मजुरांच्या
इंद्रपाल कटकवार - भंडारा
जिल्ह्यातील तालुका कृषी बीज गुणन केंद्र आणि नर्सरी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोन वर्षांपासून सुमारे ११ लाख ११ हजार रूपयांची मजुरी अडली आहे. दरवेळी पुरक मागणी केल्यानंतरही मजुरांच्या मजुरीचा अनुशेष कायम असल्याने केंद्र चालवायचे कसे? असा सवाल कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी केला आहे.
राज्याच्या कृषी विभागातर्फे एकूण १८५ तालुका बीजगुणन केंद्रांची व ९ अन्विक्षा प्रात्यक्षिक केंद्र चालविली जातात. याअंतर्गत भंडारा जिल्ह्यात ४ बीजगुणन केंद्र व दोन नर्सरी केंद्र आहेत. सदर बीज गुणन केंद्र पहेला ता.भंडारा, पालोरा ता.पवनी, डोंगरगाव ता.मोहाडी आणि साकोलाी येथे आहे. साकोली येथील कारभार कृषी उपविाभाागाीय कार्यालयातून बघितला जातो.
या केंद्रांमध्ये कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी बियाणंच्या निर्मितीचे काम येथे करण्यात येते. या केंद्रांमध्ये बियाणांची पेरणी करणे, खते निर्माण (मिक्स पध्दती) करणे, मळणी करणे, बियाणांवर प्रक्रिया, कीटकनाशकांची फवारणी करणे, बियाणांची पॅकींग ही कामे येथे केली जातात. या कामांसाठी ठेकेदारी पद्धतीने मजुर कामावर घेतले जातात. परंतु निधीअभावी या मजुरांना त्यांची मजुरी वेळेवर मिळत नाही.
या केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठी अंदाज पत्राकात होणाारी निधीचाी तरतूद अल्प प्रमाणात्त असते. परिणामी मजुरांना मजुरी वेळेवर मिळत नाही. सन २०११-१२ ची मजुरी य्यााावर्षी देण्यात आली. मात्र सनाा २०१२-१३, सन २०१३-१४ आणि सन २०१४-१५ ची मजुरी अजुनही मजुरांना मिळालेली नाही. यात पहेला, डोंगरगाव, पालोरा आणि आंधळगाव व भंडारा येथे कार्य केलेल्या मजुरांचा समावेश आहे. बीज गुणन केंद्रातील मजुरांची ४ लक्ष ३ हजार ६२८ रूपये तर नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे जवळपास ७ लक्ष ११ हजार ७८ रूपये द्यायचे आहेत.