११ हजार केव्ही तारांचा रेंगेपार येथील घरकुलांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:36 PM2018-04-22T21:36:24+5:302018-04-22T21:36:24+5:30
घरांची बांधणी सुरक्षित स्थळी असावी, पंरतु रेंगेपार येथे शासनाने दिलेल्या भुखंडावरुन ११ केव्ही उच्च दाबांच्या वीज तारा जात आहेत. तीन ते चार घरकुलांचे अर्धे बांधकाम येथे झाले आहे. घर बांधकाम करणाऱ्यांनी येथे घरकुलाचे कामे करण्यास मनाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : घरांची बांधणी सुरक्षित स्थळी असावी, पंरतु रेंगेपार येथे शासनाने दिलेल्या भुखंडावरुन ११ केव्ही उच्च दाबांच्या वीज तारा जात आहेत. तीन ते चार घरकुलांचे अर्धे बांधकाम येथे झाले आहे. घर बांधकाम करणाऱ्यांनी येथे घरकुलाचे कामे करण्यास मनाई केली. मागील एक वर्षापासुन काम बंद आहे.
रेंगेपार गाव वैनगंगा नदी काठावर वसलेले आहे. पुरग्रस्त गाव असल्याने शासनाने घरकुलांकरिता येथे भुखंड लाभार्थ्यांना दिले. जैतराम दमाहे सह इतर दोन जणांचे घरकुलावरुन ११ हजार केव्ही उच्च दाबाच्या वीज तारा जात आहेत. एका वर्षापुर्वी त्याच घरकुलांचे कामाला सुरुवात केली होती. अर्धे घरकुलाचे काम कंत्राटदाराने केले त्यानंतर उच्च दाबाच्या ताराखाली काम करतानी धक्का जाणवतो म्हणून त्यांनी काम बंद केले. येथे कुणीच काम करायला तयार नाही.
याप्रकरणी तक्रार केल्यावरही आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. शासनाने येथे दुसरा भूखंड देऊन नविन घरकुल तयार करुन देण्याची मागणी जैतराम दमाहे यांनी केली आहे. जीव धोक्यात घालुन घरकुलात कसे वास्तव्य करावे असा प्रश्न येथील लाभार्थ्यांनी केला आहे.
तीन ते चार घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल ११ हजार केव्ही वीज ताराखाली आहे. बांधकाम अर्धवट असून कामे करायला कुणीही तयार नाही .शासनाने गंभीर बाबींची दखल घेवून तोडगा काढावा.
- हिरालाल नागपुरे
पं.स. सदस्य सिलेगाव