११ ट्रक, २ ट्रॅक्टर, जेसीबी मशीन जप्त
By admin | Published: January 24, 2017 12:27 AM2017-01-24T00:27:58+5:302017-01-24T00:27:58+5:30
वैनगंगा नदीपात्राच्या निलज घाटावर मशिनच्या सहाय्याने रेतीचा नियमबाह्य उपसा सुरू होता.
रेतीचा उपसा सुरूच : करडी पोलिसांची मोठी कारवाई
तुमसर : वैनगंगा नदीपात्राच्या निलज घाटावर मशिनच्या सहाय्याने रेतीचा नियमबाह्य उपसा सुरू होता. याप्रकरणी करडी पोलिसांनी सापळा रचून ११ ट्रक, दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशिन जप्त केली. करडी पोलिसांची ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे.
भंडारा जिल्ह्यातील रेती प्रसिद्ध आहे. वैनगंगा नदी पात्रातील रेतीला नागपुरात मोठी मागणी आहे. रेती तस्कराकडून नियमबाह्यपणे रेतीचा उपसा करतात. निलज रेती घाटातून रात्रीच्या वेळी रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी नदी पात्रात धाड टाकत ११ ट्रक, दोन ट्रॅक्टर व १ जेसीबी मशीन जप्त केली. ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ९८५८, एमएच ४० एके ३५९१, एमएच ३१ सी क्यु ९५७९, एमएच ४० एके २८२४, एमएच ३६ एफ ३०२५, एमएच ३६ एफ ३४३०, एमएच ३६ जी ६६७७, एमएच ३६ जी १७५१, एमएच ४० एके ४५९१, एमएच ४० सीक्यु ३३४९, एमएच ३१ बीएस ७५५३, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी १६५२, ट्रॉली क्रमांक एमएच ३५ - ५१७०, एमएच ३५ बी ८१८० व जेसीबी मशिनचा समावेश आहे. जेसीबी मशिनचा अधिकृत कोणताच क्रमांक नाही.
सर्व वाहन जप्त करून भादंवि ७९, ५११, १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सुर्याेदय ते सुर्यास्तपर्यंतच नदी पात्रातून रेतीचा उपसा करता येतो. यातही यंत्राचा समावेश नसावा, अशी अट निविदेत नमूद करण्यात येते. रात्रीला नदीपात्रातून रेतीचा उपसा करता येत नाही. निलज रेती घाटावर यंत्राच्या साहायने मध्यरात्री रेतीचा उपसा करणे सुरू होते. त्यामुळे ट्रक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या ही वाहने करडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मध्यरात्री रेतीचा उपसा करता येत नाही. निलज रेती घाटावर रेती उपसा सुरू होता. धाड टाकून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. यात मशीनचा समावेश आहे.
-पी.के. बोरकुटे,
सहायक पोलीस निरीक्षक करडी.