अपघातात ११ महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:51 PM2019-05-30T21:51:59+5:302019-05-30T21:52:18+5:30

भरधाव काळीपिवळी जीप उलटून झालेल्या अपघातात प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह अकरा महिला जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी गावाजवळ गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घडली. जखमींना दिघोरी व भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

11 women seriously injured in the accident | अपघातात ११ महिला गंभीर जखमी

अपघातात ११ महिला गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देकाळी-पिवळी उलटली : अंगणवाडी सेविकांचा समावेश, तावशीजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भरधाव काळीपिवळी जीप उलटून झालेल्या अपघातात प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह अकरा महिला जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी गावाजवळ गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घडली. जखमींना दिघोरी व भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रंजनाबाई सुभाष शेंडे रा. बोरगाव, छाया निळकंठ डडमल रा. मुरमाडी, सुशीला दिगांबर बुध्दे रा. कोकडी, अनिता दयाराम मेश्राम रा. मानेगाव, आशा वामनराव राऊत रा. मुरमाडी, खलिता बळीराम लांडगे रा. कोदामेंढी, नितु संजय कावळे रा. मानेगाव, अनमोल रामकृष्ण घोडेस्वार रा. पारडी, नुतन रामुजी शेंडे रा. तापशी, निर्मला मधुकर खोब्रागडे रा. मुरमाडी, मयुरी जयभीम कोचे रा. चिकना अशी जखमी महिलांची नावे आहेत.
दिघोरी येथे अंगणवाडी सेविकेचे मोबाईल प्रशिक्षण सुरु होते. त्यासाठी त्या काळीपिवळी जीपने (क्र. एम एच ३६ - ३२९२) जात होत्या. तावशी शिवारात चालकाचे अचानक नियंत्रण गेल्याने जीप रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात या अकरा महिला जखमी झाल्या. जखमींना दिघोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघाताची माहिती होताच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे यांना माहिती दिली. त्यांनी भंडारा येथील रुग्णालयात जावून जखमी सेविकांची विचारपुस केली. यावेळी संघटनेचे दिलीप उटाणे, हिवराज उके, प्रभारी प्रकल्प अधिकारी खोटेले, पर्यवेक्षीका मेंढे उपस्थित होते. तर अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी रुग्णालयात जावुन अंगणवाडी सेविकांची भेट घेतली.

Web Title: 11 women seriously injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात