नदीपात्रात बुडून ११ वर्षीय बालकाचा करूण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:51 PM2018-08-25T22:51:39+5:302018-08-25T22:52:01+5:30
मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून करूण अंत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले. हर्षल विठोले (११) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खोडगाव येथील सुरनदी पात्रात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून करूण अंत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले. हर्षल विठोले (११) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खोडगाव येथील सुरनदी पात्रात घडली.
सुभाष वार्ड वरठी येथील सुमेध ठाकूर (१३), देवेंद्र गोमासे (१५) व हर्षल विठोले (११) हे तिघेही शनिवारी सकाळी खोडगाव येथील नदीत पोहायला गेले होते. नदी पात्रात जाताना तिघांनी कपडे कडून नदीत पोहण्याची तयारी केली. दरम्यान हर्षल वेगाने पाण्यात उतरला. नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज चुकल्याने तो वाहुन गेला. त्याच्या मागोमाग इतर दोन मित्र पाण्याच्या प्रवाहात जाणार एवढ्यात नदीच्या काठावर असलेल्या लोकांनी आरडाओरड केली.
देवेंद्र गोमासे हा सुद्धा पाण्याच्या दिशेने वाहून जाण्याच्या स्थितीत असताना त्याला नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले. यात दोघांचा जीव वाचला असून हर्षल पाण्यात बुडाला. त्याचे मृतदेह शोधण्याचा काम सुरू असून सायंकाळ पर्यंत शोध लागला नव्हता. हर्षल हा लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे ५ व्या वर्गात तर देवेंद्र आणि सुमेध हे नवप्रभात हायस्कुल वरठी येथे इयत्ता १० व ८ वर्गात शिकत आहेत.
तिघेही शाळेत गेले नव्हते. मृतक हर्षल हा आई वडिलांना एकुलता मुलगा आहे. त्याचे पालक फळ बाजी विक्री करतात. एक महिन्यापासून त्याची प्रकृती बरी नसल्याने तो शाळेत नियमित जात नसल्याची माहिती वडिलांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एस बी ताजने ताफ्यासह घटना स्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी दोन चमू तयार करून शोधाशोध सुरू होती. दरम्यान घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, माजी सरपंच संजय मिरासे, माजी उपसरपंच मनोज सुखाणी, सामाजिक कार्यकर्ते कैलास बन्सोड उपस्थित होते.