‘त्या’ १११ शिक्षकांना मिळाला न्याय

By admin | Published: May 14, 2017 12:17 AM2017-05-14T00:17:42+5:302017-05-14T00:17:42+5:30

अनेक वर्षे जिल्ह्याबाहेर नोकरी करून शेवटचे काही वर्षे स्वजिल्ह्यात नोकरी करण्याच्या आनंदात असलेल्या ....

That '111 teachers got justice | ‘त्या’ १११ शिक्षकांना मिळाला न्याय

‘त्या’ १११ शिक्षकांना मिळाला न्याय

Next

परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश : शिक्षकांनी मांडल्या सचिवांजवळ व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अनेक वर्षे जिल्ह्याबाहेर नोकरी करून शेवटचे काही वर्षे स्वजिल्ह्यात नोकरी करण्याच्या आनंदात असलेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बदली आदेश रद्द करून परत त्याचठिकाणी रूजु व्हावे असा आदेश ३ मे रोजी काढला. त्यामुळे या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले. त्यातच रूजु झालेल्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश शाळेत करून व पुर्ण कुटुंब स्थायिक झाल्यामुळे शिक्षकांना चिंता सतावत होती. त्यांनी ही कैफीयत आमदार डॉ. परिणय फुके यांच्यापुढे मांडल्यानंतर या शिक्षकांना न्याय मिळवून दिला.
२३ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा परिषदेने बदली आदेश काढून शिक्षकांना आंतरजिल्हा बदली करण्यास परवानगी दिली. त्यानुसार काही शिक्षक भंडारा जिल्हा परिषदेमध्ये पदस्थापना दिलेल्या ठिकाणी रूजु झाले. परंतु आंतरजिल्हा बदलीमध्ये अनियमितता झाल्याचे सांगून विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपात्र शिक्षकांची बदली रद्द करून त्याठिकाणी पात्र शिक्षकांना संधी द्यावी, असे आदेशीत केले, असे असतानाही त्यांनी सरसकट सर्व बदल्या रद्द केल्याचे आ. परिणय फुके यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आमदार परिणय फुके यांनी शिक्षकांना आश्वास्त केले.
११ मे रोजी आ. परिणय फुके व शिक्षकांचे शिष्टमंडळाने ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासोबत भेट घेऊन शिक्षकांवर झालेला अन्याय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर असिम गुप्ता यांनी आंतरजिल्हा बदली अंतर्गत रूजु झालेल्या शिक्षकांना परत न पाठविता सेवाज्येष्ठतानुसार तसेच रोस्टरनुसार पात्र-अपात्र ठरवून जे पात्र आहेत त्यांना कार्यमुक्त करू नये व कार्यमुक्तीचे आदेश मागे घेऊन अट शिथिल, पती-पत्नी एकत्रीकरण, सेवाज्येष्ठतानुसार व रोस्टरनुसार पात्र अपात्र ठरवून मगच निर्णय घ्यावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी यांना दिले.
यावेळी आ. परिणय फुके यांच्यासोबत शिक्षकांच्या शिष्टमंडळात अरविंद बारई, विलास फेंडर, कैलास बुधे, चैनराव जांभुळकर, धनपाल रामटेके आदी शिक्षक उपस्थित होते. अन्यायावर तोडगा काढल्याबद्दल शिक्षकांनी आ.परिणय फुके यांचे आभार मानले.

Web Title: That '111 teachers got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.