१२ जलप्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:00 PM2019-04-14T23:00:49+5:302019-04-14T23:01:07+5:30

वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.

12 waterproof helpless | १२ जलप्रकल्पांत ठणठणाट

१२ जलप्रकल्पांत ठणठणाट

Next
ठळक मुद्देधरणात १९ टक्के पाणी : बेटेकर बोथली व सोरणा मध्यम प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा अपुरा झाला. त्यातच काही प्रकल्पाचे पाणी रबी सिंचनासाठी सोडण्यात आले. आता सध्या जिल्ह्यातील प्रकल्पाची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या चार मध्यम प्रकल्पांपैकी बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडा पडला आहे. तर तुमसर तालुक्यातील बघेडा प्रकल्पात केवळ १२.७२ टक्के आणि चांदपूर प्रकल्पात २३.३२ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने पाणी झपाट्याने खाली जात आहे. सध्या चार मध्यम प्रकल्पात ७.३१३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.
भंडारा जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पात सध्या केवळ २०.२८ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी पवनारखारी, डोंगराळा, हिवरा आणि आमगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहे. तर कारली, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, शिवनीबांध, भूगावमेंढा या सहा प्रकल्पात केवळ पाच टक्के पाणी आहे. सध्यास्थितीत कवलेवाडा लघु प्रकल्पात ५०.३१ टक्के जलसाठा आहे. इतर तुमसर तालुक्यातील कुरमूडा, आंबागड, परसवाडा, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा, भंडारा तालुक्यातील मंडणगाव, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, गुढरी, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी, भुगावमेंढा आणि लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा, निहारवाणी, वाकल, खुर्शिपार, पुरकाबोडी जलप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावात सध्या २३.४९ दलघमी जलसाठा असून हा एकुण जलसाठ्याच्या केवळ १९ टक्के आहे. यावर्षी रबी हंगामातही पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. उन्हाळी पिकांसाठी तर एकाही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नाही.
जिल्हाभरातील मामा तलावांची स्थिती दयनीय
जिल्ह्यात असलेल्या माजी मालगुजारी (मामा) तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. केसलवाडा, कनेरी, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंद, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्यातील चान्ना, कोका, तुमसर तालुक्यातील लोभी, लाखांदुर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राळा, इंदोरा, दिघोरी, दहेगाव आणि झरी तलावात केवळ १० ते ३० टक्के जलसाठा आहे.
पाणी संकट गडद
तलावाचा जिल्हा असलेल्या भंडारा यंदा पाणी टंचाई गडद झाल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हातील ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहे. गावानजीकचे तलाव कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच दिसत आहे. परिणामी महिलांसह आबालवृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती तर मे महिन्यात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: 12 waterproof helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.