बाबासाहेबांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी होणार
By admin | Published: April 12, 2016 12:38 AM2016-04-12T00:38:31+5:302016-04-12T00:38:31+5:30
साकोली शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती १४ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत साजरी होणार आहे.
साकोली : साकोली शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती १४ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत साजरी होणार आहे.
१४ एप्रिल २०१६ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे सकाळी १० मान्यवतांचे प्रबोधनपर मनोगत, सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ वाटप, त्याचप्रमाणे ५०० बुद्धयान वाटप, मैत्री ग्रुप व माघमाया ग्रुपतर्फे मोफत आरोग्य शिबिर तसेच नागझिरा येथील डोळ्याच्या दवाखान्यात मोफत नेत्र तपासणी शिबिर सकाळी १० ते २ नेत्रतज्ज्ञ डॉ.येडे यांच्या मार्गदर्शन तसेच नॅशनल नेटवर्क आॅफ बुद्धीष्ट युथ ग्रुपतर्फे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रदर्शनी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीतर्फे यांनी विहार बांधकामकरीता दान दिला आहे. त्यांना शासनाने तयार केलेले १२५ वी जयंतीनिमित्त १० रुपयांचे शिक्के व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कार्यक्रम् . तसेच मातोश्री रमाई आंबेडकर बहुउद्देशिय संस्था रमाई चौक साकोली येथे प्रबोधनात्मक व भाऊ बाबू कव्वाल यांचा संगीतमय कार्यक्रम व विविध स्पर्धा होणार आहेत.
महामाया ग्रुपतर्फे त्याच दिवशी सकाळी ९ वाजता बाईक रॅली तालुका स्मारक समिती येथून निघेल. सायंकाळी ४ वाजता समता सैनिक दल मार्च व महारॅलीचे आयोजन एम.बी. पटेल कॉलेज चौकातून होणार आहे. सायंकाळी ५ वाजता होमगार्ड परेड ग्राऊंड येथे महाभोजनदान कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. १५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे सकाळी ६ वाजता सलग १५ तास अभ्यास उपक्रम एन.एन.बी.वाय. ग्रुपतर्फे होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता त्याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर शाक्यमुनी बहुउद्देशिय सेवा संस्था घानोड तर्फे आयोजित केले आहे. तसेच तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि. २१ ला सायंकाळी ६ वाजता कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघ तालुका साकोलीच्या वतीने सुफी भीमगीतांचा अनोखा नजराणा कार्यक्रमाचे आयोजन शिलकुमार वैद्य असून त्या अगोदर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणरा असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका स्मारक समिती, मैत्र ग्रुप, महामाया ग्रुप, कॉस्ट्राईब महासंघ, नॅशनल नेटवर्क आॅफ बुद्धिस्ट युथ ग्रुप तसेच मातोश्री रमाई आंबेडकर बहुउद्देशिय संस्था यांनी केलेला आहे. या कार्यक्रमाकरिता जवळपासचे खेडे गावची जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)