बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाची जय्यत तयारी

By admin | Published: April 9, 2016 12:31 AM2016-04-09T00:31:17+5:302016-04-09T00:31:17+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव निमित्त ९ ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन...

125th birth anniversary of Babasaheb's birth anniversary | बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाची जय्यत तयारी

बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाची जय्यत तयारी

Next

९ ते १४ एप्रिलपर्यंत महोत्सव : ११ एप्रिलला सतीश काळसेकर व भालचंद्र जोशी यांचे व्याख्यान
भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव निमित्त ९ ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारातर्फे शहरात करण्यात आले आहे.
यात ९ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता दसरा मैदानावर पुज्य भंदत सदानंद महास्थवीर, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, भदंत शिलानंद महास्थविर, भंदत ज्ञानज्योती स्थविर आदी बौध्दभिक्खूंच्या उपस्थितीत महापरिमाणपाठ व धम्मदेसना, १० ला सायंकाळी ६ वाजता दसरा मैदानात प्रसिध्द गायक व टी.व्ही. सिंगर छोटा मजीद शोला यांच्या सुगम संगीताची बहारदार मैफिल होईल. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल, प्रा. जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, धनंजय दलाल आदी मान्यवर उपस्थित राहतील. ११ एप्रिलला सायंकाळी .६.३० वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या ‘इंद्रराज सभागृहात’ ‘आजचे समाजवास्तव आणि ‘फुले-आंबेडकरी विचार’ या विषयावर प्रमुख वक्ते, कवी-लेखक आणि साहित्यचिंतक सतीश काळसेकर यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी आणि विचारवंत डॉ. भालचंद्र जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार उपस्थित राहतील. संचालन डॉ. अनिल नितनवरे तर संयोजन अमृत बन्सोड करणार आहेत. याप्रसंगी अश्ववीर गजभिये लिखित ‘भारत गणराज्यांचे विधिवत नामकरण’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल. १२ एप्रिलला सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान, रक्तगट, बालरोग, नेत्र व वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार सुशांत बन्सोडे, डॉ. मधुकर रंगारी, डॉ. संजय वाणे, डॉ. देवेंद्र फुले, डॉ. मृणालीनी फुले, डॉ. विनोद घडसिंग, डॉ. सुचिता घडसिंग-वाघमारे उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांकरिता निबंध, वक्तृत्व, व प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १३ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता दसरा मैदानात भीम-बुध्द गीत, नृत्य, अभिनय, नाटय व कलांचे प्रदर्शन करणाऱ्या ‘भंडाराज् गॉट टॅलेन्ट शो’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, हरिश्चंद्र दहिवले, डॉ. विनोद घडसिंग, डॉ. देवेन्द्र फुले आदी उपस्थित राहतील.
१४ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता गांधी चौकातील न.प. प्रवेशद्वारासमोर अभिवादन सभा होणार असून या सभेचे अध्यक्ष नगराध्यक्ष बाबुराव बागडे तर प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र गडकरी, डॉ. मधुकर रंगारी, डॉ. संजय वाणे, जयंत वैरागडे, प्रभाकर भोयर, प्रेमसागर गणवीर, गुलाब आंबोणे आदी उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता शास्त्री चौकातून सुरु होणाऱ्या ‘मोटार बाईक रॅली’ चे उद्घाटन तहसीलदार सुशांत बनसोडे करणार असून उपपोलिस निरीक्षक हृषीकेश चाबूकस्वार यांची प्रमुख उपस्थिती राहील. दुपारी १२ वाजता सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व डी.एफ.कोचे, डॉ. रवींद्र वानखेडे, गोवर्धन चौबे, करण रामटेके व इंजि.रुपचंद रामटेके यांच्या विशेष उपस्थितीत खाद्य साहित्य वितरित करण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मारक परिसरातून विविध प्रबोधनपर चित्ररथांचा समावेश असलेल्या समता रॅलीला प्रारंभ होणार असून या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी धिरजकुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू करणार आहेत. याप्रसंगी महेश जैन, महेंद्र गडकरी, विलास काटेखाये, मोरेश्वर मेश्राम, जिया पटेल, सच्चिदानंद फुलेकर आदी उपस्थित राहतील. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 125th birth anniversary of Babasaheb's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.