विविध आजारांतर्गत १३ हजार शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:14 PM2018-03-28T23:14:12+5:302018-03-28T23:14:12+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू नागरिकांच्या विविध आजारावर उपचार करण्यात येतात. या वर्षात सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण व अंतररुग्ण मिळून २ लाख ४७ हजार २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

13,000 surgeries under various diseases | विविध आजारांतर्गत १३ हजार शस्त्रक्रिया

विविध आजारांतर्गत १३ हजार शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्दे२ लाख ४७ हजार रुग्णांची तपासणी : ११५८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू नागरिकांच्या विविध आजारावर उपचार करण्यात येतात. या वर्षात सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण व अंतररुग्ण मिळून २ लाख ४७ हजार २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ७ हजार ७८७ मोठया शस्त्रक्रिया व ५ हजार ३७९ किरकोळ शस्त्रक्रिया अशा एकूण १३ हजार १६६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध राबविण्यात येतात. त्याअंतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
गरोदर महिलांची प्रसुती रुग्णालयात करण्यासाठी योजना असून या योजनेंतर्गत ६ हजार ९६१ गरोदर महिलांची प्रसुती रुग्णालयात करण्यात आली आहे.
भंडारा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी विविध आधुनिक यंत्रसामुग्री असून १२ हजार ९६३ रुग्णांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली आहे. १ हजार ८०० रुग्णांची सिटिस्कॅन तपासणी करण्यात आली आहे. तर ९ हजार ७१५ रुग्णांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली आहे.
जननी सुरक्षा योजना ही आरोग्य विभागाची महत्वाची योजना असून या योजनेत जिल्ह्याला ५ हजार २०६ एवढे उद्दिष्टय प्राप्त झाले होते.
फेब्रुवारी २०१८ अखेर या योजनेत ६ हजार ९६१ प्रसुती करण्यात आल्या आहेत. उद्दिष्टापेक्षा अधिक काम जननी सुरक्षा योजनेत करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी करण्यात येते. यावर्षी शहरी व ग्रामीण मिळून २ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील २३ हजार ४६० विद्यार्थ्यांना उपचार दिले आहे. १२५ विद्यार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून २६ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ११५८ कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी १३१ टक्के एवढी आहे. मोतीबिंदु शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट १६०० एवढे असतांना जिल्ह्यात ३४४२ मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
ही टक्केवारी २१५ टक्के एवढी आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र वाटपाचा विशेष कार्यक्रम सामान्य रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ या दोन महिन्यात ३५३ दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: 13,000 surgeries under various diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.