१३५ दिवसांचे धानाचे वाण ९० दिवसांत निसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:43 PM2017-09-28T23:43:20+5:302017-09-28T23:43:59+5:30
पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली. मात्र सदर धानाचे वाण ८५ ते ९० दिवसात निसवल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून मळणी करण्यासाठी कसरत करून तुटपुंजा धान घरी आणण्याची वेळ आली आहे.
लाखांदूर तालुका हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील शेती दोन भात पिक व रब्बी पिक घेत असतात. अशातच पावसाचे दिवस असल्याने पाणी साचून राहत असलेल्या शेतामध्ये १३० ते १३५ दिवस मळणीला येत असलेला व धानाचे वाणाची पेरणी करतात. अशातच लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी कृषी केंद्रामार्फत पाटरू सिड्स कंपनीचे १३० ते १३५ दिवसात मळणीसाठी तयार होत असणारे ४४४४ हे धानाचे वाण असून एका लोंबमध्ये ३०० ते ४०० धान होते तर एकरी उत्पादन २२ ते २७ क्विंटल होत असल्याचे माहिती पत्रकातून कंपनीने सांगितले यावरून सदर शेतकºयांनी या वाणाची लागवड केली. मात्र लागवडीपासून ८५ ते ९० दिवसात धानाचा निसवा झाला तर काही दिवसात मळणीला येत आहे.
आपण जड धान लावल्यानंतर एवढ्या कमी दिवसात धानाचा निसवा कसा झाला म्हणून तालुका कृषी अधिकारी व कृषी केंद्राला माहिती दिली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी एम.झेड. खान, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वय डॉ.उषा डोंगरवार, पीक संरक्षण अधिकारी डॉ.निलेश वझीरे, कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी विस्तार अधिकारी संजय लांजेवार यांनी विजय शाहू, आसाराम चांदेवार, देवराम परशुरामकर, राहुल कोटरंगे, मनोहर खरकाटे यांच्या शेताची पाहणी करून हे वाण ८५ ते १० दिवसात निसवल्याने शेतकºयांचे उत्पादनात काही प्रमाणात घट येईल असे सांगून आम्ही सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित कंपनीला पाठवू व असे उपविभागीय कृषी अधिकाºयांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी तज्ज्ञ अधिकाºयांकडून सर्वेक्षण करून किती नुकसान झाले आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. पाटरू सिड्सचे क्षेत्र अधिकारी अविनाश शेंडे म्हणाले, ही समस्या उष्णतेच्या कारणामुळे आली असून कमी दिवसात धान निसवला असेल असे सांगितले. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अधिकारी करीत असतील तर कृषी विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.