जिल्ह्यात १३७२ कोरोनामुक्त, ७३२ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:36 AM2021-04-27T04:36:17+5:302021-04-27T04:36:17+5:30
भंडारा : जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. सोमवारी १३७२ व्यक्तींनी ...
भंडारा : जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. सोमवारी १३७२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ७३२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून १० हजार ७५७ व्यक्ती उपचाराखाली आहेत.
जिल्ह्यात सोमवारी १४४६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ७३२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. त्यामध्ये भंडारा ३४१, मोहाडी २४, तुमसर १४६, पवनी १९, लाखनी ११६, साकोली ५६ आणि लाखांदूर तालुक्यातील ३० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २० हजार ४६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मोहाडीत ३६४५, तुमसर ५७३३, पवनी ४९६४, लाखनी ४९९८, साकोली ४३७९ आणि लाखांदूर तालुक्यात २२८८ असे ४६ हजार ०५३ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
सोमवारी १३७२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ५५८ व्यक्तींनी कोरोनाला हरविले आहे. सोमवारी २२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्यात भंडारा तालुक्यात ११, मोहाडी ३, पवनी व लाखनी येथे प्रत्येकी २, साकोली ३ आणि लाखांदूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात १० हजार ७५७ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ५२०१, मोहाडी ६४८, तुमसर १३२४, पवनी ७६१, लाखनी १२६०, साकोली १०३३ आणि लाखांदूर तालुक्यात ३३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बाॅक्स
जिल्ह्याचा मृत्यूदर १.६० टक्के
जिल्ह्यात आतापर्यंत ७३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात भंडारा तालुक्यातील ३६६, मोहाडी ६५, तुमसर ८७, पवनी ७९, लाखनी ४९, साकोली ५९, लाखांदूर ३३ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.६० टक्के आहे.