रानपाखरांच्या शिकारप्रकरणी १४ जण अटकेत, ४२ जिवंत पक्षी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:50 PM2022-01-31T12:50:01+5:302022-01-31T12:52:40+5:30

लाखांदूर वनविभागाची कारवाई

14 arrested for hunting wild birds, 42 live birds seized in bhandara lakhandur | रानपाखरांच्या शिकारप्रकरणी १४ जण अटकेत, ४२ जिवंत पक्षी जप्त

रानपाखरांच्या शिकारप्रकरणी १४ जण अटकेत, ४२ जिवंत पक्षी जप्त

Next

लाखांदूर (भंडारा) : शेतशिवारात रात्री नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने रानपाखरांची शिकार करणाऱ्या १४ शिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाखांदूर तालुक्याच्या रोहणी शिवारात रविवारी रात्री करण्यात आली. त्यांच्या जवळून शिकारीचे साहित्य व ४२ जीवंत पक्षी जप्त करण्यात आले. लाखांदूर वन विभागाने ही कारवाई केली. 

आशिष मोरेश्वर शेंडे (२२), खुशाल नत्थु शेंडे (४०), राकेश आनंदराव शेंडे (२४), ज्योतीराव सुखदेव मेश्राम (२५), आशिष सुखदेव मेश्राम (२३), किसन तुकाराम शेंडे (२६), अरविंद सहादेव शेंडे (२५), शरद देविदास शेंडे (३२), दिपक शालिकराम मेश्राम (३०), सेवक सिताराम शेंडे (४६), अमर अशोक शेंडे (२७), गणेश सहादेव शेंडे (३२), प्रदुम्मन मोरेश्वर शेंडे (२२) व अमोल शंकर मेश्राम (२४) रा. धर्मापुरी टोली ता. लाखांदूर अशी शिकाऱ्यांची नावे आहे.

लावा, तितिर, कवळी, बटर, हरीयल, तनया यांसह अन्य रानपाखरांची शिकार केल्याचे पुढे आले. नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने रानपाखरांची शिकारी करीत असल्याची गोपनिय माहिती लाखांदूर वनविभागाला देण्यात आली.  माहितीवरुन भंडारा उपवनसंरक्षक एस. बी. भलावी व सहाय्यक वनसंरक्षक आर. पी. राठोड यांच्या मार्गदर्शनात लाखांदूरचे वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहाय्यक आय.जी. निर्वाण, वनरक्षक एस. जी. खंडागळे, जी. डी. हत्ते, एम. ए. भजे, पी. बी. ढोले, बी. एस. पाटील, आर. ए. मेश्राम, प्रफुल राऊत, वनमजुर विकास भुते यांनी ही कारवाई केली. यावेळी कवळी पक्षी  ४५ पैकी ४२ जिवंत व ३ मृत, मोठी मैना २ मृत, लहान मैना मृत १ नग, शिकारीकरीता वापरण्यात आलेले नॉयलॉन जाळ्यासह अन्य साहित्य व ६ मोटार सायकल किमती ३ लाख ६० हजार रुपये व ५ मोबाईल किमती २० हजार असा एकुण ३ लक्ष ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

Web Title: 14 arrested for hunting wild birds, 42 live birds seized in bhandara lakhandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.