१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:45 PM2018-01-14T23:45:20+5:302018-01-14T23:45:44+5:30

गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे.

140 farmers give self-indication alert | १४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

Next
ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडिक : राजेगाव एमआयडीसीत हरितक्रांतीला अडसर

आॅनलाईन लोकमत
भंडारा : गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे. मात्र हेच औद्योगिक वसाहत भंडारा तालुक्यातील राजेगाववासीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरले आहे. एमआयडीसीमुहे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने राजेगाव येथील सुमारे २५० एकर शेती बंजर झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या १४० शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
राजेगावजवळून वाहणाऱ्या पाटामुळे येथील शेतकरी शेतीला सिंचन करून उत्पादन घेत होते. १९८२ च्या कालावधीत राज्य शासनाच्या औद्योगिक विकास धोरणानुसार राजेगाव येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली.
यानुसार सदर पाण्याचा प्रवाह असलेला पाट हा औद्योगिक वसाहतीतून मार्गक्रमण करणारा असल्याने तो औद्योगिक प्रक्रियेत समाविष्ट झाला. त्यामुळे या पाटाचे पाणी राजेगाव येथील नागरिकांना मिळणे बंद झाले. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सिंचनाची व्यवस्था केली अशा शेतकºयांना वगळून अन्य शेतकरी सिंचन सुविधेपासून दूर झाले. त्यामुळे त्यांच्या शेती पडिक झाल्या आहेत. परिणामी शेतकरी शेती असूनही हवालदिल झाला आहे.
औद्योगिक क्षेत्राची उभारणी करताना शासनाने येथील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते. यानुसार शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला विरोध केला असला तरी प्रशासनापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. कालांतराने औद्योगिक वसाहतीमुळे शेतकरी पाण्यापासून व रोजगारापासून वंचित झाले. यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट ओढावले आहेत. २५० एकरातील ‘हरीतक्रांती’ आता ओसाड झाली आहे.

औद्योगिक विकासाच्या नावावर ग्रामस्थांची शेती भकास केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
- शशिकांत भोयर,
जिल्हा महासचिव बसपा भंडारा.

Web Title: 140 farmers give self-indication alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.