१५ कर्करोग रुग्ण, ६४ मुख कर्करोग रुग्णांची तपासणी

By admin | Published: February 7, 2016 01:18 AM2016-02-07T01:18:22+5:302016-02-07T01:18:22+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक कर्करोग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पीयूष जक्कल होते.

15 cancer patients, 64 mother cancer patients exam | १५ कर्करोग रुग्ण, ६४ मुख कर्करोग रुग्णांची तपासणी

१५ कर्करोग रुग्ण, ६४ मुख कर्करोग रुग्णांची तपासणी

Next

जागतिक कर्करोग दिन : डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक कर्करोग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पीयूष जक्कल होते. अतिथी म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉ.पराग डहाके, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.शैलेश कुकडे, समुपदेशक प्राजक्ता पेठे, डॉ.कल्याणी निंबार्ते, डॉ.सुनिता मेश्राम दंत रोग चिकित्सक डॉ.अर्पणा जक्कल उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.कुकडे यांनी कर्करोगाची लक्षणे व तात्काळ निदान केल्याने कर्करोग लवकरात लवकर बरा होतो, याविषयी माहिती दिली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.डहाके यांनी कर्करोगाबद्दल नकारात्मक माहिती पसरली आहे. ती प्रथम दूर करणे आवश्यक आहे. कर्करोग नियमित उपचाराने बरा होऊ शकतो. त्यासाठी आत्मविश्वास जागृत करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. समुपदेशक प्राजक्ता पेठे यांनी उपस्थित रुग्णांना कर्करोगाचे आरंभिक लक्षणाविषयी मार्गदर्शन करताना, लघवीच्या सवयीमध्ये बदल होणे. एखादी जखम बरी न होणे, गिळण्यास अवघड जाणे, त्रासदायक खोकला, तोंडाच्या पोकळीमध्ये पांढरा, लाल चट्टा, स्तनाच्या आकारामध्ये बदल, स्तनामध्ये गाठ किंवा स्तनाची त्वचा जाड होणे, अतिप्रमाणात पांढरे पाणी जााणे, आदी लक्षणे आढळल्यास तपासणी करावी व निदान झाल्यास वेळेवर औषधी, किमोथेरपी व रेडिओथेरपी केल्याने कर्करोग बरा होतो याविषयी महत्व पटवून दिले.या शिबिरात १५ कर्करोग रुग्णांची तपासणी व समुपदेशन करण्यात आले. ७ महिलांचे व्ही.आय.ए. करण्यात आले. त्यापैकी स्तनाचा कर्करोग १ महिला, तोंडाचा कर्करोग १, गर्भाशयाचा कर्करोग ३ महिला रुग्ण आढळून आले. रुग्णांना पुढील उपचारासाठी बोलाविण्यात आले. मुख कर्करोग तपासणी शिबिरात २८ पुरुष व ३६ महिलांनी तपासणी केली. त्यांना समुपदेशन करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.विजय वासनिक, वित्त व पुरवठा सल्लागार प्रियंका मेश्राम, लेखापाल लिलेश्वर निखारे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 15 cancer patients, 64 mother cancer patients exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.