पाच वर्षात १५ काेटी ५५ लाख रुपये माताच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:37 AM2021-09-03T04:37:11+5:302021-09-03T04:37:11+5:30
काेराेनाचा पार्श्वभूमीवर गराेदर मातांना आधार प्राप्त झाला. त्यांनी शासनाच्या अधिसूचित केलेल्या संस्थेत नाेंदणी करणे आवश्यक आहे. अशा पात्र महिलांना ...
काेराेनाचा पार्श्वभूमीवर गराेदर मातांना आधार प्राप्त झाला. त्यांनी शासनाच्या अधिसूचित केलेल्या संस्थेत नाेंदणी करणे आवश्यक आहे. अशा पात्र महिलांना गराेदरकाळात माता, शिशू सुदृढ व निराेगी रहावे व मातांना सकस आहार घेता यावा यासाठी ही याेजना कार्यान्वित केली आहे.
बाॅक्स
तीन टप्प्यात मिळणार पैसे
प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस तीन टप्प्यात रकम मिळणार आहे. आधार संलग्न बॅंक खात्यात किंवा पाेस्ट ऑफिसमधील खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. तसेच लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास व ती या याेजनेस मात्र असल्यास महिलेला जननी सुरक्षा याेजनेंतर्गत ग्रामीण भागासाठी ७०० रुपये व शहरी भागासाठी ६०० रुपये लाभ देण्यात येईल.
बाॅक्स
पात्रतेचे निकष काय?
१ जानेवारी २०१७ राेजी अथवा त्यानंतर पहिल्यांदा प्रसूती झाली आहे अशा माता किंवा गर्भधारणा झाल्या आहे अशा मातांना या याेजनेचा लाभ मिळताे. ही याेजना एक वेळ आर्थिक लाभाची असून, पहिल्या जीवित अपत्यापूर्तीच मर्यादित आहे.
बाॅक्स
लाभासाठी काेठे संपर्क करायचा
या याेजनेसाठी गराेदर माताचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, बॅंक संलग्न आधार लिंक, पासबुक किंवा पाेस्टाचा खात्याची झेराॅक्स प्रत, माता बालसंगाेपन कार्डाची झेराॅक्स, प्रसूती झाली असल्यास बाळाचा जन्मनाेंदणी दाखल आवश्यक आहे. या याेजनेच्या लाभासाठी निकटच्या अंगणवाडी ताई, एएनएम व अंगणवाडीसेविका यांच्याशी संपर्क साधावा.
काेट
जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह १ ते ७ सप्टेंबरपर्यंत आयाेजित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेचा लाभ घेण्यासाठी आशाताई, एएनएम, अंगणवाडीसेविका यांच्याशी संपर्क साधावा.
- डाॅ. प्रशांत उईके
जिल्हा आराेग्य अधिकारी, भंडारा