रावणवाडी पर्यटनस्थळावर १५ जुगाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:45+5:302021-06-11T04:24:45+5:30
जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गाेपनीय माहिती मिळाली नेचर प्राईड रिसाॅर्टमध्ये माेठा जुगार असल्याची ती माहिती हाेती. त्यावरून ...
जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गाेपनीय माहिती मिळाली नेचर प्राईड रिसाॅर्टमध्ये माेठा जुगार असल्याची ती माहिती हाेती. त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे निर्देश दिले. बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, विवेक राऊत, रवींद्र रेवतकर, पाेलीस हवालदार धर्मेंद्र बाेरकर, गेंदलाल खैरे, तुळशीदास माेहरकर, विजय राऊत, गाैतम राऊत, सतीश देशमुख, कैलाश पटाेले, राजू दाेनाेडे, प्रशांत कुरंजेकर, स्नेहल गजभिये, संदीप भानारकर, सुमेध रामटेके, प्रशांत कुरंजेकर, सचिन खराबे, दिपाली चवळे, ज्याेती रामटेके, माधुरी चवळे यांनी धाड मारली. त्यावेळी नेचर प्राईड रिसाॅर्टमध्ये माेठा जुगार सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी १५ जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पाच कार, १४ माेबाइल, आणि दाेन लाख रुपये राेख अशा ३४ लाख ७८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व जुगारांविरुध्द अड्याळ पाेलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
बाॅक्स
गुन्हे शाखेची माेठी कारवाई
जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समूळ बिमाेड करण्याचे निर्देश पाेलिसांना दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने महिन्याभरापासून विविध धाडी टाकल्यात. बुधवारी रात्री जुगारावर धाड टाकली. ही अलीकडच्या काळातील सर्वात माेठी कारवाई हाेय. पर्यटनस्थळाच्या आड अवैध धंदे सुरू असल्याची कुणकुण पाेलिसांना लागताच ही कारवाई करण्यात आली.