१.९० कोटी रूपयांच्या वाहनांसह १५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:46 PM2017-09-28T23:46:34+5:302017-09-28T23:46:47+5:30

सूर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करण्यात येऊ नये, असा नियम असतानाही बाम्हणी रेतीघाटावर बुधवारी मध्यरात्री २ वाजता मशीनच्या सहाय्याने रेती उत्खनन सुरू होते.

15 people arrested with vehicles worth Rs 1.90 crore | १.९० कोटी रूपयांच्या वाहनांसह १५ जणांना अटक

१.९० कोटी रूपयांच्या वाहनांसह १५ जणांना अटक

Next
ठळक मुद्देरेती तस्करांचे धाबे दणाणले : तुमसर पोलिसांनी केली बाम्हणी रेतीघाटावर मध्यरात्री कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सूर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करण्यात येऊ नये, असा नियम असतानाही बाम्हणी रेतीघाटावर बुधवारी मध्यरात्री २ वाजता मशीनच्या सहाय्याने रेती उत्खनन सुरू होते. याची माहिती मिळताच तुमसर पोलीस पथकाने धाड मारून १०० ब्रास रेती दोन पोकलॅन्ड मशीन, नऊ ट्रक, एक ट्रॅक्टर असा १ कोटी ८९ लाख ४६ हजार रूपयांच्या मुद्देमालासह १५ जणांना अटक केली. याप्रकरणी भादंवि ३७९, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी बाम्हणी रेतीघाट सील करण्यात आला होता, हे विशेष.
सुर्याेदयापूर्वी व सुर्यास्तानंतर रेतीचे नदीपात्रातून उत्खनन करता येत नाही. परंतु बाम्हणी रेतीघाटावर नियमाह्य रात्री दोन पोकलॅन्डने रेतीचे उत्खनन सुरू होते. याची गोपणीय माहिती बुधवारी रात्री तुमसर पोलिसांना मिळाली. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, उपनिरीक्षक सुरेश हावरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने धाड घातली. वैनगंगा नदीपात्रात दोन पोकलॅन्ड मशीनने रेतीचे उत्खनन सुरू होते. त्या सर्वांना ताब्यात घेऊन तुमसर पोलिसांनी कारवाई केली. रेती उत्खनन प्रकरणी आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
या कारवाईत पोकलँड (क्र. एएक्स २०० एलसी २००१-५८८५, एलसीएस १०० २०८४८) टिप्पर क्र.एमएच ३६/१२५४, एमएच ०६ एक्यु ४४२५, एमएच ३६ एफ ४४५७, एमएच ३६ एफ ५४३५, एमएच ३१ सीबी ३०३३, एमएच ४० एके ३५९१, एमएच ४० बीसी १६१९, एमएच ४० एके १४५९१, एमएच ३६ एफ १६८७, ट्रॅक्टर क्र.एमएच ३६ एल ८६५, डस्टर कार क्र.एमएच ३६ एच ६६११ असे १ कोटी ८९ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी जनवीर वकील अहमदखान रा.भंडारा, समीर नौशाद अहमद खान रा.भंडारा, अब्दुल आरीफ शेख रा.भंडारा, चंद्रकुमार गजभिये रा.सालेबर्डी, पवन नंदनवार रा.गणेशपूर, संजय वरकडे रा.किटाडी, राजेश वैरागडे रा.भंडारा, आदेश गोस्वामी रा.पलाडी, तुषार लुटे रा.किटाडी, भगवान बारई रा.पचखेडी, रामदास सोनवाने रा.गोटीटोक ता.रामटेक, शैलेश धांडे रा.माथनी ता.मौदा, रविंद्र वहाने रा.खुर्शीपार, बेनिराम हत्तीमारे रा.कळमना, दिनेश जामूनपाने रा.कळमना यांना अटक करण्यात आली. तुमसर शहरापासून चार कि़मी. अंतरावर वैनगंगा नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. येथे महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे रेती वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. यापूर्वी आ.चरण वाघमारे यांनी धाड टाकून हा रेतीघाट बंद केला होता. न्यायालयीन आदेशाने हा रेतीघाट सुरू झाला. येथे रात्रीबेरात्री रेती उत्खनन सुरू असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: 15 people arrested with vehicles worth Rs 1.90 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.