खमारीत १५० गरिबांना मिळतेय मोफत ‘शिवभोजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:23+5:302021-08-02T04:13:23+5:30

राज्य शासनाने शेतकरी, शेतमजूर, कामगार व अतिगरजूंची अन्नाची भूक भागवी म्हणून शिवभोजन थाली उपक्रम सुरू केला. कोरोना महामारीत प्रथम ...

150 poor get free 'Shiva food' in Khamari | खमारीत १५० गरिबांना मिळतेय मोफत ‘शिवभोजन’

खमारीत १५० गरिबांना मिळतेय मोफत ‘शिवभोजन’

Next

राज्य शासनाने शेतकरी, शेतमजूर, कामगार व अतिगरजूंची अन्नाची भूक भागवी म्हणून शिवभोजन थाली उपक्रम सुरू केला. कोरोना महामारीत प्रथम शहरात सुरू झालेल्या उपक्रमाची व्याप्ती आता ग्रामीण भागापर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या काळात अन्नासाठी होणारी परवड थांबण्यास यामुळे मोठी मदत झाल्याची भावना व्यक्त होत आहेत.

खमारी येथे शक्ती स्वयंसहाय्यक महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवभोजन उपक्रम अगदी मोफत राबविला जात आहे. गरिबांना बसस्थानक परिसरात दुपारी ११ ते ३ वाजता पर्यंत निःशुल्क १५० थाली भोजन उपलब्ध केले जात आहे. त्यानंतर १०० थालीसाठी प्रती थाली ५ रुपये शुल्क आकारले जाते. थालीत भात, पोळी व भाजी दिली जात असल्याची माहिती महिला बचत गटाच्या संचालक मानिका विजय मोटघरे यांनी दिली.

यावेळी सामाजिक कायकर्ता आशिष चवळे, सरपंच क्रिष्णा शेंडे, उपसरपंच राजू मोटघरे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजयकुमार बंसोड, अंकोश मारवाडे, फुलचंद मारवाडे, यादोराव मारवाडे, राजू अहिरकर, चक्रधर राजवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

010821\img_20210801_115028.jpg~010821\img_20210801_115020.jpg

खमारीत १५० गरीबांना मिळतोय मोफत 'शिवभोजन'~खमारीत १५० गरीबांना मिळतोय मोफत 'शिवभोजन'

Web Title: 150 poor get free 'Shiva food' in Khamari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.