९८ कोटीतून साकारणार १५७ किमी रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:36 PM2018-08-05T22:36:56+5:302018-08-05T22:37:39+5:30
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ९७.९४ कोटी रुपये खर्चून १५६.८२ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ९७.९४ कोटी रुपये खर्चून १५६.८२ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली होती. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यत राज्यभरात हजारो किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहे. यावर्षी योजनेला उशीरा सुरुवात झाली. राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला निधीची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा शुक्रवारला ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे लाभदायक ठरली आहे. जिल्ह्यातील ४७ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री /मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना केली आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी ६ कोटी ८२ लाख
सातही तालुक्यातील एकूण १५६.८२ किलोमिटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी ६.८२ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४७ कामाला प्रारंभ होणार आहे.
राज्यमार्ग ते लेंडेझरी, खापा रोंघासाठी सर्वाधिक निधी
तुमसर, पवनी, साकोली तालुक्यातील प्रत्येकी आठ, मोहाडी एक, भंडारा १२, लाखांदूर चार, तर लाखनी तालुक्यातील सहा रस्ता कामाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात तुमसर तालुक्यात राज्यामार्ग ते लेंडेझरी, खापा रोंघा या ८.४७ किमीसाठी ६८१.०७ लाखांचा सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वात कमी निधी पवनी तालुक्यातील राज्यमार्ग ३५४ ते वडेगाव या एक किलोमीटर रस्त्यासाठी ५२.५३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
सातही तालुक्यात रस्त्यांचे जाळे
भंडारा तालुक्यातील चिचोली शिवनी ते काटी या ३.१५ किमी. रस्त्यासाठी २०४.३८ लाख, राज्यमार्ग ते उसर्रा ते टाकला या २.२३ किमी साठी १३४.०८ लाख, राज्य मार्ग ते पांजरा ग्रामदान या ४.०१ किमीसाठी ३२७.२१ लाख, राज्यमार्ग ते सालई (बुज) या २.०२ किमीसाठी ८९.७७ लाख, राज्यमार्ग ते खैरलांजी रस्ता या २ किमीसाठी १२२.०४ लाख, राज्यामार्ग ते गणेशपूर-पिंडकेपार-कोंरभी देवी (परसोडी) या ४.५३ किमी साठी २६१.६८ लाख, राज्यमार्ग कवडसी ते सालेबर्डी रस्ता या ४.४० किमी साठी २५६.०५ लाख, राज्यमार्ग नांदोराटोला ते नांदोरा रस्ता या २.९३ किमीसाठी १८७.२६, राज्यमार्ग लावेश्वर ते इंदुरखां या २.८६ किमीसाठी १८८.७९ लाख, मानेगाव ते अर्जुनी या ३ किमीसाठी १६२.१४ लाख, जिल्हामार्ग ते उसरागोंदी या २.१० किमीसाठी ११७.६४ लाख, जिल्हामार्ग खुर्शीपार, रावणवाडी, ते वाकेश्वर राज्यमार्ग या ४.७१ किमीसाठी २७७.१८ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.
तुमसर तालुक्यातील राज्यमार्ग ते मुरली मांगली या २.८६ किमीसाठी २११.११ लाख, राज्यमार्ग ते मच्छेरा धनेगाव या ५.०३ किमीसाठी २७६.३७, राज्यमार्ग रनेरा ते रुपेरा या १.५८ किमी साठी १०६.७९ लाख, राज्यमार्ग ते खैरलांजी सितेपार रस्ता २.३८ किमीसाठी १६६.९८, चुल्हाड ते बिनाकी या १.८७ किमीसाठी १२३.२०, राज्यामार्ग ते लेंडेझरी,खापा रोंघा या ८.४७ किमीसाठी ६८१.०७, गुढरी ते धामलेवाडा २.५० किमीसाठी १४९, राज्यमार्ग ते पाथरी १.५० किमीसाठी ७७.२९ लाख रुपयांची मंजूरी मिळाली आहे. मोहाडी तालुक्यात केवळ एक रस्ता मंजूर करण्यात आला असून चिचोला ते नवेगाव धुसाळा, घोरपड या ९ किमी रस्त्यासाठी ५३९.४१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पवनी तालुक्यात जिल्हा मार्ग ते पन्नाशी २.८८ किमीसाठी २०३.१९ लाख, राज्यमार्ग ते लावडी १.५० किमीसाठी ८४.८५, जिल्हा मार्ग ते कोदुर्ली रस्ता २.१५ किमीसाठी १६१.९०, राज्यमार्ग ते वडेगाव रस्ता १ किमीसाठी ५२.५३, चिखली ते केसलापुरी २.५० किमीसाठी १४०.१८ लाख, पवनी ते सेलारी सिरसाडा २.७३ किमीसाठी १४३.२१, एमएसएच ते मेंढेगाव २.७७ किमीसाठी १४०.३७, सावरला ते विलम ३.३८ किमीसाठी १९९.१२ लाख रुपये. तर लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते अंतरगाव चिचोली ४.८२ किमीसाठी ४१५.४७ लाख, जिल्हामार्ग ते बारव्हा बोथली, दांडेगाव ७.५२ किमीसाठी ४०२.१४, दहेगाव ते पिंपळगाव ३.६२ किमीसाठी १९१.४७, ओपारा ते भागडी ४.३९ किमीसाठी ३३८.९६ लाखाचा निधी मंजूर झाला.
साकोली तालुक्यातील जिल्हामार्ग ते पळसगाव-वांगी जिल्हासीमा रस्ता २.७१ किमीसाठी १५६.०४, जिल्हा मार्ग ते चारगाव सुंदरी रस्ता २.२२ किमीसाठी १३०.१४, जिल्हा मार्ग ते पापडा-नैनपूर १.८० किमीसाठी १३१.८१, राज्यमार्ग ते शिवनीबांध १.३५ किमीसाठी ८६.३९, राज्यामार्ग ते किन्ही पळसपाणी २.७० किमीसाठी १६२.८२, राज्यमार्ग ते मक्कीटोला १.११ किमीसाठी ६४.८८, राज्यमार्ग ते जांभडीसडक ४.५० किमी २७६.५४, राज्यमार्ग ते खैरी-वलनी- वलमाझरी ४.५० किमीसाठी २५२.१३ लाख. तालुक्यातील राष्टÑीय महामार्ग ते चान्ना-धानला-पेंढरी ७८५ किमीसाठी ५१६.७२, गुरढा ते इसापूर २.४६ किमीसाठी १४०.७०, सानगाव ते गोंदी देवरी २.८० किमीसाठी १४३.०१, लाखनी ते खेडेपार ४.७८ किमीसाठी २९६.१४, लोहारा ते नरव्हा १.६० किमीसाठी ८७.७७, पिंपळगाव ते रेंगेपार-चिचटोला-धाबेटेकडी-शिवनी- मोगरा-नान्होरी-मुरमाडी-तुपकर-झरप-कोल्हारी-खुनारी- खराशी रस्ता ४.५० किमीसाठी २५७.४३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.