तुमसर तालुक्यात १६ उमेदवार अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:36+5:302021-01-08T05:55:36+5:30

तुमसर: तुमसर तालुक्यात १८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, १६० जागेसाठी ३८६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चार गावाच्या चार प्रभागातील ...

16 candidates in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात १६ उमेदवार अविरोध

तुमसर तालुक्यात १६ उमेदवार अविरोध

googlenewsNext

तुमसर: तुमसर तालुक्यात १८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, १६० जागेसाठी ३८६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चार गावाच्या चार प्रभागातील १६ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजणाऱ्या तुमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. या संक्रमण काळात गावागावात उत्साह दिसून येत आहे. ४२५ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले. त्यापैकी ३९ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले. त्यामुळे ३८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे १८ ग्रामपंचायतीच्या ५९ प्रभागात १६० जागेसाठी निवडणूक होत आहे. १६ उमेदवार अविरोध निवडून आले. यात पिंपरी चिमणी, महालगाव लेंडेझरी, आलेसूर गावाचा समावेश आहे.

सर्वाधिक उमेदवार चुल्हाड आणि पवनाखारी येथे प्रत्येकी ३२ आहेत, तर अंबागड येथे २८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अत्यंत चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मांढळ व तुडका येथील निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बाॅक्स

निवडणूक चुरशीची होणार

तुमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींची निवडणूक अत्यंत चुरशीचा होणार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची ही रंगीत तालीम ठरणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर पॅनल उभे करण्यात आले आहे. निवडणुकीनंतर गावाच्या सरपंचाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे, तरीसुद्धा उमेदवारात व मतदारात कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

संभाव्य पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे उमेदवार कुंपणावर

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर लगेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणूक लढणारे इच्छुक उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सध्या दूर दिसत आहेत. गावामध्ये आपल्याला फटका बसू नये म्हणून पडद्याआडून राजकीय भूमिका पार पाडत आहेत. मतदानाच्या अंतिम दोन दिवसापूर्वी आपली निवडणूक भूमिका ते वठविण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या हातात कशाला येतील, यासंदर्भात स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केल्याचे समजते.

Web Title: 16 candidates in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.