सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध

By admin | Published: May 11, 2016 12:52 AM2016-05-11T00:52:47+5:302016-05-11T00:52:47+5:30

वैयक्तिक विवाहाच्या अतिखर्चीक पद्धतीमुळे समाज बांधव आर्थिक कोंडीत गुदमरू नये, सामाजिक बांधीलकी कायम राहावी.

16 couples married at the group wedding | सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध

सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध

Next

तेली समाज बांधवांचा उपक्रम : जोडप्यांना दिले गृहोपयोगी साहित्य भेट, मान्यवरांनी दिला शुभाशीर्वाद
भंडारा : वैयक्तिक विवाहाच्या अतिखर्चीक पद्धतीमुळे समाज बांधव आर्थिक कोंडीत गुदमरू नये, सामाजिक बांधीलकी कायम राहावी. श्रम आणि वेळ वाचावा तसेच समाजाचे संघटन कायम राहावे म्हणून संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ भंडारा अंतर्गत शनिवारला लाल बहादूर शास्त्री विद्यालयात तेली समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १६ जोडपी विवाहबद्ध झाली. वरांची भव्य मिरवणूक संताजी मंगल कार्यालयापासून मन्रो शाळेपर्यंत डफऱ्या, तुतारी तसेच ढोल ताशांच्या सानिध्यात काढण्यात आली होती.
याप्रसंगी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जवळजवळ १० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सोहळ्यात वर वधूंना भेटवस्तूंचे व नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी वर वधूंच्या पालकांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मंडळाकडून प्रती जोडप्यास एक स्टील कपाट, गुरुदेव बर्तन भंडार यांचेकडून पाच भांडी देण्यात आली. भंडारा येथील ड्राय फ्रूटवालाचे संचालक बैस व बिकानेर स्वीट मार्ट यांचेकडून प्रत्येक जोडप्याला ड्राय फ्रूट व मिठाईचे डबे देण्यात आले.
आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांचेकडून प्रत्येक वधूस शिलाई मशीन देण्यात आली. सुरेश मस्के यांना महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल मंडळाकडून त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळातर्फे विवाह झालेल्या जोडप्यांना शासनाच्या शुभमंगल योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. सोहळ्याचे प्रास्ताविक अध्यक्ष अ‍ॅड.धनराज खोब्रागडे यांनी केले.
त्यावेळी विवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, भंडाराचे नगराध्यक्ष बाबूराव बागडे तुमसर पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, भंडारा पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, लॉयन्स क्लबचे ज्ञानेश्वर वांदिले, भंडाराभूषण डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे, प्रशांत कामडे, बळवंत मोरघडे, येनूरकर, उमेंद्र भेलावे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, भगवान बावनकर, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, भरत खंडाईत, युवराज वासनिक, एकानंद समरीत, शाम वंजारी, सुभाष वाघमारे, जगन्नाथ कापसे, सुनिल साखरवाडे आदी समाजबांधव उपस्थित होते.
सदर विवाह सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.धनराज खोब्रागडे, देवीदास लांजेवार, रविशंकर भिवगडे, जीवन भजनकर, पुरुषोत्तम वैद्य, उद्धवराव डोरले, रामदास शहारे, धनराज साठवणे, रामू शहारे, सेवक कारेमोरे, लेखराज साखरवाडे, कल्पना नवखरे, शोभा बावनकर तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे पदाधिकारी सरिता मदनकर, लता खोब्रागडे, कुंदा वैद्य, रंजना भिवगडे, छबू रघुते आदींनी सहकार्य केले. संचालन रविशंकर भिवगडे यांनी तर आभार पुरुषोत्तम वैद्य यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 16 couples married at the group wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.