पाणलोट विकासासाठी १६ लाखांचा निधी
By admin | Published: May 29, 2015 12:53 AM2015-05-29T00:53:27+5:302015-05-29T00:53:27+5:30
परिसरातील ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करित असलेल्या सिहोरा येथील मंडळ कृषी कार्यालयाला पानलोट योजनेत विकास कार्यासाठी १५ लाख ९६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे.
चुल्हाड (सिहोरा) : परिसरातील ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करित असलेल्या सिहोरा येथील मंडळ कृषी कार्यालयाला पानलोट योजनेत विकास कार्यासाठी १५ लाख ९६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीअंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.
सध्या हरदोली गावात असणाऱ्या सिहोऱ्याच्या मंडळ कृषी कार्याल्याला ७३ गावे जोडण्यात आली आहेत. शेतकरी आणि गावात विकास कार्यातुन न्याय देण्यासाठी शासनाने पानलोट योजना सुरु केली आहे. ही योजना सन २०१३ मध्ये सुरुवात करण्यात आली असून सन २०१९ पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. या कालावधीत विकास कामे करण्यासाठी ५ कोटी ९३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ५ वर्षाच्या कालावधी करीता नियोजनबध्द वार्षिक रित्या कामांना सुरुवात झाली आहे.
आधीचे २ वर्ष गावागावात जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजनात निघून गेली आहेत. खऱ्या अर्थाने गावांना न्याय देणाऱ्या वर्षाला सुरुवात झाली आहे. या कार्यालयाने यंदा शासनाला विकास कार्यासाठी ४ टक्के निधीची मागणी केली असता १५ लाख ९५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. १ टक्के निधी कपात करण्यात आली आहे.
यात ७ लाख रुपये निधीचा समावेश आहे. येत्या काही दिवसात पहिला टप्पा अंतर्गत विकास कामे घेतली जाणार आहेत. यात प्रेरक, प्रवेश उपक्रम, गाळ उपसणे, बोरवेल्स, हातपंप दुरुस्ती, धोबीघाट, बाह्य खेळांचे साहित्य, तथा अन्य कामे केली जाणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतात पानलोट योजनेची लाट पोहचणार आहे. यात शेततळे, मनगी, पुर्नजीवन, बचतगट आदींना मदत केली जाणार आहे.
या कालावधीत शेतीचे धुरे बांधकाम केली जाणार आहेत. पंरतु या योजनेचे दुर्देव आहे. कोट्यावधी रुपये योजनेवर खर्च केली जात आहेत. निधी खर्चाचे सर्वाधिकार गावातील पानलोट समितीला आहेत. कुशल तथा बांधकाम करणारी कामे होत आहे. पंरतु अस्थाई स्वातंत्र अभियंता नियुक्त नाही. निधी खर्च करताना अंदाजपत्रक तथा मोजमाप पुस्तिका तयार केली जात आहे. तांत्रिक अभियंताचा शोध घेतला जात आहे. यामुळे सध्या भागम्भाग सुरु झाली आहे. या योजनेची अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी आर. एच. उईके यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही.
जीर्ण इमारतीत प्रशासकीय कारभार करित असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत करण्याचे आश्वासन आ. चरण वाघमारे यांनी दिले होते. परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही प्रक्रिया तथा दोन्ही विभागाचे पत्र व्यवहार सुरु झाले नसल्याने स्थानांतरणाचे प्रयत्न हवेतच विरणार असल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)