२८ हजार मतदार निवडणार १६० ग्रामपंचायत सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:45+5:302020-12-30T04:44:45+5:30
तालुक्यातील पिपरी चुन्नी, लेंडेझरी, आलेसूर, पांजरा - रेंगेपार, गाेंडीटाेला, सुकळी नकूल, पवनारखारी, स्टेशनटाेली, आंबागड, तुडका, येदरबुची, महालगाव, पिपरीया, मांढळ, ...
तालुक्यातील पिपरी चुन्नी, लेंडेझरी, आलेसूर, पांजरा - रेंगेपार, गाेंडीटाेला, सुकळी नकूल, पवनारखारी, स्टेशनटाेली, आंबागड, तुडका, येदरबुची, महालगाव, पिपरीया, मांढळ, चिंचाेली, चुल्हाड, पिपरा, कवलेवाडा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नामांकन दाखल करण्याला २३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून २८ डिसेंबरपर्यंत केवळ २८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. ऑनलाईन अर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना ग्रामीण उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे. दरम्यान मंगळवारी नामांकन दाखल करण्यासाठी माेठी गर्दी झाली हाेती. विशेष म्हणजे बुधवार ३० डिसेंबर हा नामाकंनाचा शेवटचा दिवस आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार १७६ मतदार असून पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ४५९ तर महिला मतदारांची संख्या १३ हजार ७१७ आहे. या निवडणुकीने ग्रामीण वातावरण चांगलेच तापले आहे. तरुणांमध्ये निवडणूकीवरुन जाेश दिसत आहे. विविध पक्षही अप्रत्यक्षपणे या निवडणुकीत सहभागी हाेत असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची माेर्चे बांधणी यातून केली जात आहे.
बाॅक्स
नविन इमारतीत साेयीसुविधांचा अभाव
तुमसर तहसील कार्यालयाच्या जवळ प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले नाही. इमारतीला दारे, खिडक्या आणि विजेची व्यवस्था नाही. अशा स्थितीत तेथे नामांकन अर्ज दाखल करुन घेतले जात आहे. उमेदवारांना खाली बसून कागदपत्रे भरावी लागतात. कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागताे.