सतरा कोटीच्या पुलाची किमत झाली 3५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:30+5:30
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाची निर्मिती करीत आहे. २००७ मध्ये रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेकडून सहा कोटी दहा लाख ९४ हजार मंजूर करण्यात आले होते. तर राज्य शासनाने येथे दहा कोटी मंजूर केले होते. एकूण १७ कोटी ५० लाख पुलाची किंमत आज ३५ कोटीवर गेली आहे. परंतु अजूनही उड्डाणपूल बांधकाम पूर्ण झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपुलाची सुरुवातीची किंमत १७ कोटी ५० लाख होती. आज या पुलाची किंमत ३५ कोटींवर गेली आहे. मागील सहा वर्षापासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. येथील सर्विस रस्ता खड्डेमय झाला असून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांसह वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाची निर्मिती करीत आहे. २००७ मध्ये रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेकडून सहा कोटी दहा लाख ९४ हजार मंजूर करण्यात आले होते. तर राज्य शासनाने येथे दहा कोटी मंजूर केले होते. एकूण १७ कोटी ५० लाख पुलाची किंमत आज ३५ कोटीवर गेली आहे. परंतु अजूनही उड्डाणपूल बांधकाम पूर्ण झाले नाही. कोराेना काळात या पुलाचे काम बंद होते. केवळ रेल्वेने येथे काम सुरु ठेवले होते परंतु कामाची गती मंद आहे.
राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतर झाले. तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाच्या सर्विस रस्ता अरुंद आहे. राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची वाहतूक दरम्यान अरुंद सर्विस रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. सर्विस रस्ता खड्डेमय झाल्यानंतर तात्काळ दुरुस्ती केली केली जात नाही. त्यामुळे प्रवासी वाहतुकदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. देव्हाडी येथील रेल्वे फाटकाजवळ सर्विस रस्त्यावरमोठा खड्डा पडला आहे.
त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अरुंद सर्व्हिस रस्ता त्यावरही खड्डा त्यामुळे प्रवाशांनी येते संताप व्यक्त केला आहे. राज्य शासनाची कामे बंद: दोन्ही बाजूकडील पोच मार्गावरील उड्डाणपुलाचे काम राज्य शासन येथे करीत आहे. मागील सहा वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. या पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दिल्ली येथील एका तज्ञ पथकाला येथे बोलावण्यात आले. परंतु कोरोना संक्रमण काळात सदर पथक येथे आले नाही. त्याची प्रतीक्षा येथे आहे. उड्डाणपूल सेवेत दाखल व्हावा अशी मागणी आहे.
सर्व्हिस रस्ता दुरूस्त करणार कोण?
रेल्वे फाटक जवळ सर्विस रस्त्यावर मोठा खड्डा मागील अनेक दिवसापासून पडला आहे. परंतु सदर रस्ता दुरुस्त करण्याची तसदी संबंधित कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले नाही. सदर खड्डा कोण दुरुस्त करणार असा प्रश्न ते पडला आहे. रेल्वे प्रशासन उड्डाणपुलाच्या मुख्य सिमेंट पिल्लर उभारण्याचे काम करीत आहे. चार बिल्डरचे कामे येथे ९० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे ट्रॅक वरून लोखंडी स्पान येथे घालण्यात येत आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी येथे भेट दिली आहे.