१७ लाख ५९,९७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:32 PM2018-05-26T23:32:20+5:302018-05-26T23:32:39+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवार २८ मे २०१८ रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

17 lakh 59,977 voters will vote for vote | १७ लाख ५९,९७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

१७ लाख ५९,९७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

googlenewsNext
ठळक मुद्देचोख बंदोबस्त : मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवार २८ मे २०१८ रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१४९ मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी ४७२८ बॅलेट युनिट, २३६६ कंट्रोल युनिट व २७२४ व्हिव्हिपॅट वापरले जाणार आहेत. लोकसभा पोट निवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे. या निवडणूकीत राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष व अपक्ष मिळून १८ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक खर्च नोडल अधिकारी अशोक मातकर, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम व अधिकारी उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्हयात १२१० मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६६५५ अधिकारी कर्मचारी, १९०९ पोलीस कर्मचारी व ५ तुकडया अतिरिक्त पोलीस बल नेमण्यात आले आहे. गोंदिया जिल्हयासाठी ९३९ मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून ५१३५ अधिकारी कर्मचारी, १९२४ पोलीस कर्मचारी व १४ अतिरिक्त पोलीस दल तुकडया नेमण्यात आल्या आहेत. या सोबतच भंडारा-गोंदिया जिल्हयात असलेल्या २१४९ मतदान केंद्रावर अनुक्रमे १४० व १०३ असे एकूण २४३ सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
आचार संहिता लागल्यापासून दोन्ही जिल्हयात आचार संहितेची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान भंडारा जिल्हयात अवैद्य दारु वाहतुकीच्या १६६ प्रकरणात १२ हजार २६१ लिटर मद्य व गोंदिया जिल्हयात २१० प्रकरणात ११९४ लिटर असे एकूण ३७६ प्रकरणात १३ हजार ४५५ लिटर अवैद्य दारु जप्त करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे भंडारा जिल्हयात ८ लाख २५ हजार रोख जप्त करण्यात आली आहे.
मतमोजणी ३१ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल लागणार आहेत. यासाठी एकूण 84 सुक्ष्म निरिक्षक, ९६ मतमोजणी पर्यवेक्षक व ९६ मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टॅबुलेशन पथक व सिलींग पथक यांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीनंतर ईश्वरचिठ्ठीच्या आधारे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रातील व्हिव्हिपॅटची मते मोजण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Web Title: 17 lakh 59,977 voters will vote for vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.