१७ लाख ९१ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:54 PM2019-03-11T22:54:26+5:302019-03-11T22:54:50+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली असून यात आठ लाख ९७ हजार ४४० पुरूष तर आठ लाख ९४ हजार २१२ महिला मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली जाणार असल्याने मतदारांची संख्या वाढणार आहे.

17 lakh 91 thousand voters | १७ लाख ९१ हजार मतदार

१७ लाख ९१ हजार मतदार

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : आठ लाख ९७ हजार पुरूष तर आठ लाख ९४ हजार महिला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली असून यात आठ लाख ९७ हजार ४४० पुरूष तर आठ लाख ९४ हजार २१२ महिला मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली जाणार असल्याने मतदारांची संख्या वाढणार आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली आणि गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात नऊ लाख ७७ हजार ६६४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात तुमसर मतदार संघात दोन लाख ९७ हजार ८७ मतदार असून एक लाख ५० हजार ७४५ पुरूष तर एक लाख ४६ हजार ३४२ महिला मतदार आहे. भंडारा मतदार संघात तीन लाख ६५ हजार ८४४ मतदारांची नोंदणी झाली असून एक लाख ८२ हजार ८५२ पुरूष आणि एक लाख ८२ हजार ९९२ महिला मतदार आहे. साकोली मतदार संघात तीन लाख १४ हजार ६८३ मतदार असून एक लाख ५९ हजार ५३८ पुरूष आणि एक लाख ५५ हजार १४५ महिला मतदारांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदार संघात दोन लाख ५० हजार २५८ मतदार असून त्यात एक लाख २६ हजार २९४ पुरूष आणि एक लाख २३ हजार ९६४ महिला मतदार आहे. तिरोडामध्ये दोन लाख ५१ हजार १८९ मतदारांची नोंदणी झाली असून त्यात पुरूष एक लाख २४ हजार ५९१ आणि एक लाख २६ हजार ५९८ महिला मतदाराचा समावेश आहे. गोंदिया विधानसभा मतदार संघात तीन लाख १२ हजार ५९१ मतदार असून एक लाख ५३ हजार ४२० पुरूष तर एक लाख ५९ हजार १७१ महिला मतदार आहेत.
विधानसभा क्षेत्रनिहाय सर्वात कमी मतदार अर्जुनी मोरगाव या मतदार संघात आहे. तर सर्वाधिक मतदार भंडारा मतदार संघात तीन लाख ६५ हजार ८८४ आहे. गत २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा एक लाख दोन हजार ४०८ मतदारांची वाढ झाली आहे. २०१४ मध्ये १६ लाख ८९ हजार २८४ मतदार होते. भंडारा जिल्ह्यात १२ हजार ९३७ नव मतदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
भंडारा, तिरोडा, गोंदियात महिला मतदार अधिक
साधारणत: पुरूष मतदार मतदारांची संख्या मतदार यादीत अधिक दिसून येते. परंतु भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतदार संख्येवर नेजर टाकल्यास भंडारा, तिरोडा आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. गोंदिया विधानसभा क्षेत्रात पाच हजार ७५१, तिरोडा विधानसभा क्षेत्रात २००७ आणि भंडारा विधानसभा क्षेत्रात १४४ महिला मतदार पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

Web Title: 17 lakh 91 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.