धानाचे १७० कोटींचे चुकारे थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:37+5:302021-05-01T04:33:37+5:30
बॉक्स बोनसवर कुणी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे पैसे आधारभूत किमतीनुसार जमा झाले आहेत. शासनाने ७०० रुपये बोनस ...
बॉक्स
बोनसवर कुणी बोलायला तयार नाही
शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे पैसे आधारभूत किमतीनुसार जमा झाले आहेत. शासनाने ७०० रुपये बोनस घोषित केला होता. मात्र, अद्याप बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. कोरोना संसर्गामुळे शेतकऱ्यांच्या बोनसबाबत कुणी बोलायला तयार नाही. अद्याप आधारभूत किमतीनुसार काही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळायचे आहे. तेव्हा बोनस कधी मिळणार हा प्रश्न आहे.
बॉक्स
भरडाईअभावी धान गोदाम हाउसफुल्ल
यंदा धान भरडाईचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. आधारभूत केंद्रावर खरेदी केेलेला धान गोदामात पडून आहे. अनेक ठिकाणी गोदाम हाउसफुल्ल झाल्याने अर्धा अधिक धान उघड्यावर ठेवला आहे. हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या धानाचे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच उन्हाळी हंगामातील धान खरेदीही प्रभावित होण्याची शक्यता आहे.