शिष्यवृत्तीमुळे १७० विद्यार्थी लाभान्वित
By admin | Published: February 16, 2017 12:26 AM2017-02-16T00:26:10+5:302017-02-16T00:26:10+5:30
२०१६-१७ या शैक्षणिक सत्राकरिता ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या दिल्या गेलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा येथील १७० विद्यार्थ्यांना मिळाला.
भंडारा : २०१६-१७ या शैक्षणिक सत्राकरिता ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या दिल्या गेलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा येथील १७० विद्यार्थ्यांना मिळाला. एका आयोजित कार्यक्रमात निवडक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
ज.मु. पटेल महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना दरवर्षी या उपक्रमा अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लावण्यासाठी पुस्तके, बस पास, शिकवणी वर्गाची फिस, परीक्षा शुल्क आदीच्या स्वरूपात मदत करते. या स्तुत्य उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. संघटनद्वारे दिल्या जाणाऱ्या या मदतीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फार मोलाची मदत झाली आहे. सदर शिष्यवृत्ती करिता संघटनेच्या व्यवस्थापन समितीद्वारे गरजू विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक मुलाखती घेतल्या जातात व त्यांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या या स्तुत्य आणि सातत्यपुर्ण उपक्रमाची व त्यांच्या सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेची प्रशंशा केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. डी.आय. शहारे यांनी संघटनेच्या वैशिष्टपुर्ण कार्याची प्रशंशा केली. संघटनेचे संयोजक रामविलास सारडा यांनी मिळलेल्या मदतीचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त बीज करावे असे आवाहन केले. अशा उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्या कडून मिळत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यास हातभार लावताना धन्यता वाटते, असेही ते म्हणाले. याप्रसंगी महेंद्र निंबार्ते, कुमार नशिने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संघटनेचे सदस्य राधाकिसन झंवर, इंद्रजीत आनंद, मोहन नायर, उद्धव डोरले, दिपक सारडा, नदीम खान आदींचे सहकार्य लाभले. ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्नीकर यांनी संचालन केले. डॉ. प्रशांत धनवलकर, डॉ. उमेश बन्सोड, डॉ. आनंद मुळे व डॉ. विणा महाजन यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)